Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागलं, केंद्र सरकारने तब्बल ३ रुपयांनी वाढवलं उत्पादन शुल्क

Petrol, Diesel Price Today: भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे तेलाचे दर वाढले आहेत.

central govt excise duty on both petrol and diesel increased by rs 3 per liter 
Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागलं, केंद्र सरकारने तब्बल ३ रुपयांनी वाढवलं उत्पादन शुल्क   |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: कोरोना व्हायरसच्या वाढता प्रभाव यामुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे याचदरम्यान, सरकारने तेलाच्या किंमती वाढवल्या आहेत. सरकारच्या अधिसूचनेनुसार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर तीन रुपये वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. यापूर्वी जागतिक बाजारपेठेत मागणी घटल्याने  कच्च्या तेलाची किंमत ४.८३ टक्क्यांनी घसरून २,३६३ रुपये प्रति बॅरलवर एवढी झाली आहे.

कोरोना प्रभाव

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे आणि त्याचा परिणाम जगातील अर्थव्यवस्थांवरही दिसून येत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगात 'प्राइज वॉर' देखील पाहायला मिळत आहेत. भारतात काही दिवसांपूर्वी तेल कंपन्यांनी किंमतींमध्ये मोठी कपात केली होती. परंतु आता केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार नाही. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरत असताना सरकारने हे पाऊल उचलले आहे.

रुपयात देखील घसरण 

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना व्हायरस जागतिक संसर्गजन्य रोग जाहीर केल्यानंतर भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १७ महिन्यांच्या नीचांकावर पोचला आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदार डॉलरच्या दिशेने झुकल्याने गुरुवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७४.३४ वर पोचला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसरले

याआधी, आंतरराष्ट्रीय वायदा बाजार इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) वर ब्रेन्ट क्रूडचा मे कॉन्ट्रॅक्टमध्ये  मागील सत्राच्या तुलनेत १.०२ टक्क्यांनी घसरणीसह ३२.८८ डॉलरवर व्यापार करीत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी