Corona : दिल्ली-महाराष्ट्रासह 5 राज्यांना केंद्राचे पत्र; परिस्थिती हाताळण्यासाठी नवीन गाइडलाइन तयार करण्याच्या सूचना

चीन (China) आणि अमेरिकेत (United States) कोविडची  (Covid) वाढती प्रकरणे पाहता आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) पाच राज्यांना इशारा दिला आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 150 नवीन रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Centre's letter to 5 states including Delhi-Maharashtra
कोरोनापासून दक्षता घेण्यासाठी केंद्राचं पाच राज्यांना पत्र   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, केरळ आणि मिझोराममध्ये गेल्या सात दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट अचानक वाढला
  • 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाणार आहे.

नवी दिल्ली : चीन (China) आणि अमेरिकेत (United States) कोविडची  (Covid) वाढती प्रकरणे पाहता आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) पाच राज्यांना इशारा दिला आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 150 नवीन रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 365 आहे. अशात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम सरकारांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आरोग्य सचिवांनी राज्यांना सतर्कता वाढवण्यास आणि संसर्गाचे प्रमाण वाढण्याच्या कारणांचा गांभीर्याने तपास करण्यास सांगितले आहे.

आरोग्य सचिवांनी सांगितले की, या राज्यांमध्ये दररोज सकारात्मकतेचे प्रमाण वाढत आहे, म्हणजेच दररोज नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. हे पाहता, राज्य सरकारांनी परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घ्यावा आणि आवश्यक असल्यास कोविड-19 बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, केरळ आणि मिझोराममध्ये गेल्या सात दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट अचानक वाढला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि मिझोरामला अलर्ट पाठवला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत केरळमध्ये 353, महाराष्ट्रात 113, हरियाणामध्ये 336 आणि मिझोराममध्ये 123 रुग्ण आढळले आहेत. 

18+ वयोगटातील सर्वांना मिळेल तिसरा डोस

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या धोक्यादरम्यान, सरकारने जाहीर केले आहे की 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाईल. आरोग्य मंत्रालयाने याला प्रिकॉशन डोस असे नाव दिले आहे. हे आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना विनामूल्य दिले जाईल, तर उर्वरित प्रौढांना पैसे द्यावे लागतील. हा डोस खासगी लसीकरण केंद्रांवर दिला जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी