Noida News: नोएडाच्या या सोसायटीत सुरू आहेत चक्क पैसे नसलेल्या बॅंका, जाणून घ्या या बॅंकाबद्दल

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 16, 2022 | 15:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Noida News । बॅंक आणि पैसे यांचे नाते सर्वात जवळचे आहे. पैसे आणि बॅंक दोघांची गणना एकमेकांशिवाय केली जाऊ शकत नाही. आज आपण अशा काही बॅंकाबाबत भाष्य करणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कल्पना देखील नसेल. या सर्व बॅंका नोएडा येथे आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या बॅंकांमध्ये पैसे किंवा मौल्यवान वस्तू नसून कचरा साचला आहे.

Century Society in Noida has become the number one society in terms of cleanliness
नोएडाच्या या सोसायटीत सुरू आहेत चक्क पैसे नसलेल्या बॅंका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नोएडाच्या सेंच्युरी सोसायटीत सुरू आहेत चक्क पैसे नसलेल्या बॅंका.
  • ज्यामध्ये भांडी बँक, कापड बँक, बॅग बँक, बुक बँक, औषध बँक, प्लास्टिक बाटली बँक आणि वेस्ट बँक इत्यादींचा समावेश आहे.
  • या बॅंकामुळे नोएडाची एक सोसायटी सौंदर्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण गौतम बुद्ध नगरमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.

Noida News । नवी दिल्ली : बॅंक आणि पैसे यांचे नाते सर्वात जवळचे आहे. पैसे आणि बॅंक दोघांची गणना एकमेकांशिवाय केली जाऊ शकत नाही. आज आपण अशा काही बॅंकाबाबत भाष्य करणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कल्पना देखील नसेल. या सर्व बॅंका नोएडा येथे आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या बॅंकांमध्ये पैसे किंवा मौल्यवान वस्तू नसून कचरा साचला आहे. मात्र अशा बॅंकाचे काय काम असेल याबाबत तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झाला असेल. पण या बॅंकामुळे नोएडाची एक सोसायटी सौंदर्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण गौतम बुद्ध नगरमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. (Century Society in Noida has become the number one society in terms of cleanliness). 

अधिक वाचा : मनसेकडून भाजप नेत्यांना हनुमान चालीसा पुस्तकांची भेट

कचऱ्याच्या परिसराला बनवले आकर्षित पार्क

आरडब्ल्यूएचे सरचिटणीस पवन यादव यांनी सांगितले की, येथील रहिवाशांनी सेंच्युरी सोसायटीच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली असून आज भंगार, कचरा असलेल्या परिसराचे एका आकर्षित पार्कमध्ये रूपांतर केले आहे. २०१९ पासून प्राधिकरणाने स्वच्छता स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. सोसायटीतून कमीत कमी मोडतोड कशी बाहेर काढायची आणि जुन्या गोष्टींचा पुनर्वापर कसा करायचा हा यामागील प्रमुख हेतू आहे. यासाठी वेगवेगळ्या बँका तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये भांडी बँक, कापड बँक, बॅग बँक, बुक बँक, औषध बँक, प्लास्टिक बाटली बँक आणि वेस्ट बँक इत्यादींचा समावेश आहे.

अधिक वाचा : उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

या बॅंका कशा काम करतात? 

कापड बॅंक - कापड बॅंकेतर्फे समाजातील लोकांना आवाहन केले जाते की, तुमच्या घरात जे काही जुने कपडे आहेत ते तुम्ही येथील मेनगेटवर जमा करा आणि ते कपडे गरजू व्यक्तींना द्या. तसेच जे कपडे कोणाला उपयोगी पडू शकत नाहीत त्या कापडाला टेलरकडे देऊन कापडी पिशव्या बनवल्या जातात. 

बॅग बॅंक - पवन यादव यांनी सांगितले की, आम्ही गेटवर शिंपीच्या जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या कापडी पिशव्या ठेवतो, जे रहिवासी बाजार, आठवडी बाजार, मदर डेअरी, जनरल स्टोअर किंवा इतर ठिकाणी सामान घेण्यासाठी गेटवर जातात. त्यांना या पिशव्या दिल्या जातात. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद होऊ शकतो.

बुक बॅंक - रहिवासी आणि मुले त्यांची जुनी पुस्तके (Book) किंवा घरात ठेवलेली न वापरलेली पुस्तके इथे देतात. ज्या मुलाला हवे आहे, ते मोफत पुस्तक घेऊ शकतात आणि मुले त्यांच्या पुस्तकाची एकमेकांशी देवाणघेवाणही करतात. 

अधिक वाचा : मुंबईसाठी आजचा सामना म्हणजे 'करो या मरो'

प्लास्टिक बाटलांची बॅंक - या बॅंकेमध्ये कचऱ्यात आलेली प्लास्टिकची बाटली आहे. प्लास्टिकच्या बाटल्या घरात वापरल्यानंतर त्या कचऱ्यात टाकू नयेत, असे आवाहन रहिवाशांना करण्यात आले आहे. त्या प्लास्टिकट्या बाटल्या बँकेच्या स्वरूपात जमा केल्या जातात आणि बाटल्यांपासून बाटल्यांचे बेंच बनवले जातात आणि त्यांचा पुनर्वापर केला जातो, ज्यामुळे घरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होते. 

वेस्ट मटेरियलची बँक - घरातून बाहेर पडणारा कोणताही टाकाऊ पदार्थ इथेच साठवला जातो. घरांमध्ये काम करताना टॉयलेट सीट्स, वॉशबेसिन सीट्स आणि पेंट बॉक्सचे रिकामे डब्बे इथे साठवले जातात. कामाच्या दरम्यान जे काही साहित्य शिल्लक राहते किंवा घराबाहेर पडते, त्या साहित्यापासून जागेवर बसण्यासाठी बेंच आणि भांडी बनवली जातात. 

औषध बँक - लोक औषधे खरेदी करत असतात. जे काही औषध शिल्लक आहे. ते येथे जमा केले जातात. नोएडा लोकमंचच्या मदतीने सोसायटीच्या गेटवर एक बॉक्स बसवण्यात आला आहे. जिथे लोक त्यांच्या घरात उरलेली औषधे देतात आणि तेथून ते औषध बँकेत पाठवले जाते.

भांड्यांची बँक - भांड्यांची बँक २०१९ मध्ये सुरू झाली. यामध्ये सर्व रहिवाशांकडून देणग्या घेण्यात आल्या आहेत. एक ताट, ग्लास आणि चमचे असे सुमारे ३५० भांड्यांचे सेट तयार करण्यात आले आहेत. आता रहिवासी किंवा सोसायटीचे जेवढे काही सामूहिक कार्यक्रम होतात. या सर्वांमध्ये ही भांडी वापरली जातात. भांड्यांच्या बँकेतून भांडी मोफत मिळतात. जो कोणताही रहिवासी येथून मोफत घेऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी