[VIDEO] भर रस्त्यातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळवली, घटना सीसीटीव्हीत कैद

दिल्लीमध्ये दोन मोटरसायकलस्वारांनी छावला येथील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी भर रस्त्यातून खेचून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

chain snatching
[VIDEO] भर रस्त्यातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळवली, घटना सीसीटीव्हीत कैद  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • दोन बाइकस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून केला पोबारा
  • राजधानी दिल्लीतील छावला परिसरात घडली घटना
  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून तपास सुरु

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक गुन्हेगार हे अजिबात न घाबरता दिवसढवळ्या आता गुन्हे करु लागले आहेत. त्यामुळे आता गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही असंच म्हणावं लागेल. कारण की, राजधानी दिल्लीतील एक असा व्हिडिओ समोर आला आहे की, ज्यामुळे सध्या दिल्ली पोलिसांवर टीका सुरु आहे. दिल्लीत भररस्त्यात दोन बाइकस्वारांनी थेट महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून घेतली आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

वृत्त संस्था एएनआयच्या मते, ही घटना राजधानी दिल्लीतील छावला परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एक महिला आपल्या मुलाला शाळेतून घेऊन परत चालली होती. त्याचवेळेस दोन चोरट्यांनी भररस्त्यातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून नेली. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, दोन चोरटे हे बाइकवरुन आले आणि त्यांच्या मागच्या बाजूला एक महिला ही आपल्या मुलाला घेऊन चालत घरी चालली होती. 

बाइकवरुन आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने महिला निर्जन स्थळी जाण्याची वाट पाहिली. त्यानंतर जशी महिला त्या ठिकाणी आली त्याचवेळी दोघा चोरट्यांपैकी एकाने थेट महिलेजवळ जात तिच्या गळ्यातील चेन खेचली आणि तिथून तात्काळ पोबारा केला. यावेळी महिलेने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण दोघंही बाइकरुन सुसाट विरुद्ध दिशेला निघून गेले. 

रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित महिलेने तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवली आहे. सध्या पोलीस प्रकरणी तपास करत आहे. पण अद्याप त्यांना याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अद्याप तरी त्यांना यश आलेलं नाही. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये अशा प्रकारे चोऱ्या होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...