बिहारमध्ये राजकीय भुकंपाची शक्यता वाढली, मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

जेडीयूचे (JDU) माजी (Former ) राष्ट्रीय अध्यक्ष (National President ) आरसीपी सिंह (RCP Singh) यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे (Bihar) राजकारण चांगलेच तापले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री (Chief Minister) नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्षा (President ) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी संपर्क साधला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते.

Chief Minister Nitish Kumar met Sonia Gandhi
मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली सोनिया गांधींची भेट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नितेश कुमार आणि भाजप यांच्यात दुरावा.
  • नितीश कुमार यांनी भाजपपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला.
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे.

पटणा :  जेडीयूचे (JDU) माजी (Former ) राष्ट्रीय अध्यक्ष (National President ) आरसीपी सिंह (RCP Singh) यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे (Bihar) राजकारण चांगलेच तापले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री (Chief Minister) नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्षा (President ) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी संपर्क साधला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. नितेश कुमार (Nitish Kumar) आणि भाजप (BJP) यांच्यात फार पटत नसल्याचं बोलले जातं आहे. तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी दिल्लीमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. 

मागच्या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींवर नजर टाकली तर भाजप आणि नितीश कुमार यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसत आहे. महिनाभरात 4 वेळा नितीश कुमार यांनी भाजपपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read Also : भारताला १८वे Gold, शरथ कमल आणि श्रीजा अकुला जोडीने केली कमाल

नितीश कुमार भाजपपासून लांब

17 जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली तिरंग्याबाबत देशाच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली, पण या बैठकीला नितीश कुमार गेले नाहीत. यानंतर 22 जुलैला तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाच्या भोजनासाठीही नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं, पण या कार्यक्रमालाही ते गेले नाहीत. 25 जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण सोहळ्यालाही नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं, यालाही नितीश कुमार यांनी दांडी मारली. 7 ऑगस्ट म्हणजेच आज नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या नीती आयोगाच्या बैठकीला बोलावण्यात आलं, पण ते या बैठकीलाही आले नाहीत.

आमदार आणि खासदारांची बैठक 

दरम्यान, निती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने नितेश कुमार हे रविवारी राजधानी दिल्लीत उपस्थित होते आणि त्याचवेळी या भेटीगाठी घडलेल्या आहेत. त्यामुळे नितेश कुमार यांची पुढची वाटचाल काँग्रेस सोबत असणार आहे का? असा सवाल असा बिहारच्या राजकारणात विचारण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू आणि काँग्रेसने आपापल्या विधीमंडळ पक्षांची बैठकही बोलावली आहे. जेडीयू आणि भाजपची युती तुटू शकते आणि त्यानंतर जेडीयू काँग्रेससोबत जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी जेडीयूच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली असून, पक्ष भाजपसोबतची युती तोडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Read Also : महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवू : CM

आरसीपी प्रकरणामुळे वाद

माजी केंद्रीय मंत्री आणि आरसीपी सिंग यांनी जेडीयूच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आरसीपी सिंग यांच्यामुळेच भाजप आणि जेडीयू यांच्यातला वाद वाढला. आरसीपी सिंग आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. आरसीपी जेडीयूमध्ये भाजपचा माणूस म्हणून काम करतात, असंही बिहारमध्ये बोललं जातं. मागच्या वर्षी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा नितीश कुमार यांच्या मर्जीशिवाय आरसीपी सिंग यांना मंत्री करण्यात आले.

Read Also : भारताने विंडीजविरुद्धची T२० सीरिज ४-१ अशी जिंकली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी आरसीपी सिंग यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलं नाही, त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, यानंतर नितीश आणि आरसीपी यांच्यातले अंतर वाढत गेले. भाजप आरसीपी यांचा जेडीयूला कमजोर करण्यासाठी वापर करत असल्याचं नितीश कुमार यांना वाटत आहे. यानंतर त्यांनी आरसीपी सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यामुळे आरसीपी यांनी जेडीयूमधून राजीनामा दिला.

जेडीयू नेत्यांमध्ये भाजपविषयी नाराजी

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंग यांनी आरसीपी सिंग यांच्यावर निशाणा साधला. काही जण बिहारमध्ये पुन्हा एकदा 2020 च्या चिराग पासवान मॉडेलचा वापर करण्याच्या तयारीत होते, पण नितीश कुमार यांनी हे षडयंत्र ओळखलं. आरसीपी तनाने जेडीयूसोबत होते, पण त्यांचं मन दुसरीकडे होतं, असं म्हणत ललन सिंग यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. 

आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयूचे राष्ट्रीय सचिव राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, जेडीयूने भाजपसोबतची युती पूर्ण प्रामाणिकपणे केली आहे. जेडीयूसोबतच्या युतीला कुठलाही संसर्ग होऊ न देण्याची जबाबदारीही भाजपची आहे. पण भाजपकडून जे संकेत मिळत आहेत ते योग्य नाहीत. भाजपची ही भूमिका युतीच्या भवितव्याची चिंता वाढवणारी आहे. काही लोक (भाजपचे) जेडीयूविरोधात कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

नितीश कुमारसाठी आरजेडी सॉफ्ट

मागच्या काही दिवसांपासून आरजेडीदेखील नितीश कुमार यांच्याप्रती नरमाईची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. आरजेडीने सर्व प्रवक्त्यांना नितीश कुमार यांच्याविरुद्ध टीका करण्यावर बंदी घातली आहे. नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि दोघं 11 ऑगस्टपर्यंत बिहारमध्ये सरकार बनवण्याचा प्रयत्न करू शकतात, असं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी