नामांकित स्कूलमध्ये मोठी दुर्घटना ! मधल्या सुट्टीत डब्बा खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले झाड, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

Chandigarh News: पडलेले झाड हे हेरिटेज ट्री असून ते 250 वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी शाळेत पोहोचून एकच गोंधळ घातला.

Chandigarh: A 250-year-old tree fell on the girls who were having lunch in a reputed school
नामांकित स्कूलमध्ये मोठी दुर्घटना ! मधल्या सुट्टीत डब्बा खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले झाड, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चंढीगडच्या कारमेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पिंपळाचे झाड कोसळले,
  • एका मुलाचा मृत्यू, अनेक जखमी
  • जवळपास 16 मुली झाडाखाली गाडल्या गेल्या.

Tree Falls At School ; चंदीगडमधील एका शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सेक्टर ९ येथील कारमेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जेवण घेत असलेल्या मुलींवर झाड पडले. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला तर डझनहून अधिक मुली जखमी झाल्या. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सुमारे 15 ते 16 मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पडलेले झाड हे हेरिटेज वृक्ष असून ते 250 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी शाळेत पोहोचून एकच गोंधळ घातला. या अपघाताबाबत शाळा व्यवस्थापनाने फारशी माहिती दिलेली नाही, त्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. या शाळेत फक्त मुलीच शिकतात. (Chandigarh: A 250-year-old tree fell on the girls who were having lunch in a reputed school, the death of the girl student, the condition of many is critical.)

अधिक वाचा : नदीच्या पाण्यात अर्टिगा गेली वाहून; कारमधल्या 9 जणांचा मृत्यू; मुलगी थोडक्यात बचावली

.

प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले

हिराक्षी या विद्यार्थिनीला पीजीआयमध्ये नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. अन्य १५ जखमी विद्यार्थिनींवर सेक्टर १६ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते एक मोठे पिंपळाचे झाड होते. जेवणाच्या वेळी काही मुली त्याखाली बसून जेवण करत होत्या. त्याचवेळी हे झाड जमिनीवरून उखडून खाली पडले. जवळपास 16 मुली झाडाखाली गाडल्या गेल्या. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेची माहिती घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पालक शाळेत पोहोचले आणि त्यांच्यात मुलांबाबत घबराट पसरली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी