Chandrayaan-2: ISRO पास, चांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश 

Chandrayaan-2 Entered the Moon: इस्रो (ISRO) आपल्या सर्वांत कठिण परीक्षेत पास झाला आहे. मंगळवारी चांद्रयान-2 नं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारताचं हे मोठं यश मानलं जातं आहे. 

Chandrayaan-2
Chandrayaan-2: ISRO पास, चांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश  

थोडं पण कामाचं

  • अंतराळ क्षेत्रात भारतानं आपल्या यशाचा झेंडा बुलंद केला आहे.
  • मंगळवारी चांद्रयान-2 नं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
  • ७ सप्टेंबरला चंद्रमाचा पृष्ठभागावर लँडर विक्रम उतरेल
  • चांद्रयान-2 नं ९ वाजून २ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.

Chandrayaan-2 Entered the Moon: अंतराळ क्षेत्रात भारतानं आपल्या यशाचा झेंडा बुलंद केला आहे. मंगळवारी चांद्रयान-2 नं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता ७ सप्टेंबरला चंद्रमाचा पृष्ठभागावर लँडर विक्रम उतरेल. चांद्रयान-2 नं ९ वाजून २ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. देशातील दुसरा स्पेसक्राफ्ट चांद्रयान 2 नं मंगळवारी सकाळी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय स्पेस एजन्सीनं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 2 वर लावण्यात आलेले दोन मोटर्स सक्रिय केल्यानंतर हे स्पेसक्राफ्ट चंद्राच्या कक्षेत पोहोचला आहे. चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर इस्रो कक्षेच्या आतमध्ये स्पेसक्राफ्टच्या दिशेत चार वेळा (२१,२८ आणि ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबर) आणखी परिवर्तन करेल. त्यानंतर चांद्रयान 2 चंद्राच्या ध्रुवावरून जाऊन सर्वांत जवळ १०० किलोमीटरच्या अंतरावर आपल्या अंतिम कक्षाकडे जाईल.

त्यानंतर विक्रम लँडर २ सष्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळं होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. इस्रोनं सांगितलं की, चंद्राच्या पृष्ठभागावर ७ सप्टेंबर २०१९ ला लँडर उतरण्याआधी पृथ्वीवरून दोन सूचना दिल्या जातील. ज्यामुळे लँडरची गती आणि दिशेत सुधारणा करण्यात येईल आणि हळूवारपणे पृष्ठभागावर उतरेल. 

बंगळुरूच्या जवळ असलेल्या ब्याललू स्थित डीप स्पेस नेटवर्क ( आयडीएसएन) च्या एंटीनाच्या मदतीनं बंगळुरूत असलेल्या इस्रो,टेलीमेट्री, ट्रॅकिंग अॅन्ड कमांड नेटवर्क (आयएसटीआरएसी) च्या मिशन ऑपरेशन्स कॉप्लेक्स (एमओएक्स) नी यानाच्या स्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे. इस्रोनं १४ ऑगस्टला म्हटलं होतं की, चांद्रयान-2 च्या सर्व प्रणाली व्यवस्थित काम करत आहेत.

याच महिन्याच्या सुरूवातीला चंद्रावर उतरविण्यासाठी पाठविलेले यान अवकाशात पृथ्वीच्या कक्षेत  भ्रमण करत होते. या दरम्यान यानातील एलआय-४ कॅमेऱ्याने अवकाशातून दिसणाऱ्या पृथ्वीचे काही मनमोहक फोटो काढले. हे फोटो इस्रोच्या मुख्यालयातून प्रसिद्धीसाठी देण्यात होत्या. यानाने २ ऑगस्ट रोजी आपली कक्षा वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यान आतापर्यंतच्या प्रवासात सध्या चंद्राच्या सर्वांत जास्त जवळ पोहोचले आहे. चांद्रयान-2 नं यापूर्वी आपली कक्षा वाढवण्याचे तीन टप्पे पूर्ण केले होते. नुकताच त्याने चौथा टप्पाही पार केला आहे. या टप्प्यावरूनच चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्याने पृथ्वीचे काही सुंदर फोटो घेतले आहेत.  चांद्रयान-2  टप्प्या टप्प्याने आपली कक्षा वाढवत आहे. त्याने २६ जुलै रोजी दुसऱ्यांदा कक्षा वाढवली होती. त्यानंतर २९ जुलैला तिसऱ्या टप्प्याती कक्षा वाढवण्यात आली. 

चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार

इस्रोने २२ जुलै रोजी जीएसएलव्ही मार्क थ्री द्वारे प्रक्षेपण करून चांद्रयान-2 अवकाशात पाठवले आहे.चांद्रयान-2 चे मुख्य तीन पार्ट आहेत. त्यात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर हे तीन प्रमुख भाग आहेत. यातील ऑर्बिटरचे वजन २ हजार ३७९ किलो तर, विक्रम नावाच्या लँडरचे वजन १ हजार ४७१ किलो आहे. तर प्रग्यान नावाच्या रोव्हरचे वजन २७ किलो आहे. यासह यानात दोन प्लेलोड्स आहेत. चांद्रयान-2  पृथ्वीच्या कक्षेतील भ्रमण पूर्ण केल्यानंतर चंद्राकडे कूच करेल आणि त्याच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यानंतर विक्रम लँडरचांद्रयान-2 मधून वेगळा होईल आणि विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरले.

चांद्रयान २ ही भारताची दुसरी चंद्र मोहीम आहे. याआधी २००८मध्ये भारताने चंद्रावर पहिले यान पाठवले होते. मात्र त्यावेळी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले नव्हते. चंद्रापासून काही अंतरावर हे प्रदक्षिणा घालत होते. चांद्रयान १च्या माध्यमातून चंद्रावरील पाण्याचा शोध घेतला गेला होता. चांद्रयान २ हे त्याच्यापुढचे एक पाऊल आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...