विद्यार्थ्यांनं व्यक्त केली राष्ट्रपती होण्याची इच्छा, त्यावर मोदींनी दिलं हे उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या केंद्रात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्यांशी संवाद साधला. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

PM Modi with students
विद्यार्थ्यांनं व्यक्त केली राष्ट्रपती होण्याची इच्छा, त्यावर मोदींनी दिलं हे उत्तर  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोमध्ये देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.
  • मोदींनी त्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
  • इस्त्रोमध्ये चांद्रयान २ चे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत मोदींनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

बंगळुरूः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोमध्ये देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. इस्त्रोमध्ये चांद्रयान २ चे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत मोदींनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी एका विद्यार्थ्यांनं आपल्याला भविष्यात राष्ट्रपती होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मोदींनी त्या विद्यार्थ्यांला उत्तर दिलं आहे. 

एका विद्यार्थ्यांनं आपल्याला भविष्यात राष्ट्रपती व्हायचं आहे असं स्वप्न असल्याचं मोदींना सांगितलं. त्यासाठी कोणत्या स्टेप्स मी फॉलो करू?  असा प्रश्न त्या विद्यार्थ्यांनं मोदींना विचारला. त्यावर मोदींनी त्या विद्यार्थ्यांची पाठ थोपाटत वाह अशी शाबासकी दिली. त्यानंतर मोदींनी उत्तर देत म्हटलं की, राष्ट्रपती का बनायचे आहे? पंतप्रधान का नाही बनायचे?     मोदींच्या या उत्तरावर तो विद्यार्थी गोंधळला आणि अन्य विद्यार्थी हसायला लागले. 

इस्त्रोमध्ये काल देशभरातून निवडून ६० ते ७० विद्यार्थी आले होते. त्याचसोबत मोदी यांच्यासोबत चांद्रयान २ पाहण्यासाठी भूतानमधील विद्यार्थीही आले होते. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना स्वाक्षऱ्या देखील दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत साधलेल्या संवादाचे व्हिडिओ आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

इस्रोच्या स्पेस क्विझ स्पर्धेच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर हे विद्यार्थी येथे आले होते. यात दिल्लीचा मनोज्ञ सिंह सुयांश, ओडिशाचा चिन्मय चौधरी, मेघालयचा रिबेत फावा याच्यासह एकूण ६० विद्यार्थी इस्त्रोच्या क्विझ स्पर्धेत यशस्वी झाले होते. तसंच भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोनं अवकाश कार्यक्रमांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी ऑगस्टमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्विझ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या क्विझमध्ये जो कोणी पास झाला त्या साठ जणांची निवड या चांद्रयान २ चे अवतरण इस्त्रोच्या मुख्यालयात बसून बघण्यासाठी करण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...