Chandrayaan 2: चांद्रयान २ मोहिमेसंदर्भात सर्वात मोठी बातमी

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 08, 2019 | 15:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chandrayaan 2: भारताच्या आंतराळ संशोधन महत्वाकांक्षी योजनेतील चांद्रयान २ मोहिमेच्या संदर्भात एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑर्बिटरला संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचं स्थान कळालं आहे.

Chandrayaan 2
Chandrayaan 2 

थोडं पण कामाचं

  • देशवासीयांसाठी आनंदाची बातमी
  • विक्रम लँडरचं स्थान कळालं
  • ऑर्बिटरने लँडरचं थर्मल छायाचित्र काढलं
  • इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांची माहिती

नवी दिल्ली: भारताच्या चांद्रयान २ मोहिमेसंदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. चांद्रयान २ मोहिमेतील लँडर विक्रमचं स्थान कळालं आहे. विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता आणि आता विक्रम लँडरसोबत संपर्क झाला असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी दिली आहे.

इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी रविवारी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, लँडर विक्रमचं स्थान कळालं आहे आणि ऑर्बिटरने लँडर विक्रमचा थर्मल फोटो क्लिक केला आहे. आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरच संपर्क होईल असंही के. सीवन यांनी म्हटलं आहे.

भारतीय संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान २ हे चंद्रावर पाठवलं. या चांद्रयान २ मोहिमेतील लँडर विक्रम सात सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होणार होतं. चंद्रापासून लँडर विक्रम अवघे २.१ किलोमीटर दूर असताना त्याचा संपर्क कंट्रोल रूमसोबत तुटला आणि तेव्हा पासून लँडर विक्रमचा काहीही संपर्क होत नव्हता. अखेर आता एक चांगली बातमी आली आहे की, ऑर्बिटरने लँडर विक्रमचा फोटो क्लिक केला आहे.

लँडर विक्रमसोबत संपर्क झालेला नाहीये मात्र, विक्रम लँडरचं स्थान कळालं असून ऑर्बिटरने त्याचा फोटो क्लिक केला आहे. यामुळे इस्रोच्या संशोधकांसोबतच संपूर्ण भारतवासीयांच्या आशा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. लँडर विक्रमसोबत संपर्क झालेला नाहीये मात्र, लवकरच संपर्क होईल असा विश्वास इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान भारताच्या चांद्रयान २ मोहिमेचं संपूर्ण जगभरात कौतुक केलं जात आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि यूएईने सुद्धा भारताच्या या मोहिमेचं कौतुक केलं आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाने केवळ इस्रोचं कौतुक केलं नाहीये तर भविष्यात इस्रोसोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...