Chandrayaan 2 live Streaming: कुठे आणि कसं पाहाल चांद्रयान २चं लँडिंगचं लाइव्ह प्रक्षेपण 

चांद्रयान २ हे भारताचं सर्वात महत्त्वाकांक्षी असं अंतराळ मिशन आहे. जे ७ सप्टेंबरला मध्यरात्री चंद्रावर लँड होणार आहे. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण असं पाहा. 

Chandrayaan_2_ISRO_3
कुठे आणि कसं पाहाल चांद्रयान २चं लँडिंगचं लाइव्ह प्रक्षेपण (isro) 

थोडं पण कामाचं

  • ७ सप्टेंबरला मध्यरात्री चांद्रयान २ चंद्रावर उतरणार 
  • भारताची अंतराळ एजन्सी (isro)चा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे चांद्रयान २ 
  • चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणारं हे पहिलंच यान असणार आहे

श्रीहरिकोटा: चांद्रयान २ चं लँडर आणि त्याच्या आतील रोव्हर हे आज चंद्रावर लँडिंग करणार आहे. यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सध्या विक्रम लँडर आणि त्याच्या आत असणारं प्रज्ञान रोव्हर हे सध्या चंद्राच्या कक्षेत परिभ्रमण करत आहे. ७ सप्टेंबरला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास यानाचं लँडिंग चंद्राच्या पृष्ठभागावर होणार आहे. या संपूर्ण मिशनसाठी ९७८ कोटी रुपये एवढा खर्च आला आहे. श्रीहरिकोटामधील इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्र येथून २२ जुलैला चांद्रयान २ लाँच करण्यात आलं होतं.

या महत्त्वाकांक्षी मिशनबाबत सगळेच आशादायी आहेत. सध्या चांद्रयान हे चंद्राच्या अधिक जवळ पोहचत आहे. भारताने शक्तिशाली रॉकेट जियोसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हीकल-मार्क III (GSLL Mk III)१७०x४५, ४७५ किमी अंडाकृती कक्षेत पाठविण्यात आलं आहे. आता या यानाचं लँडर रात्री उशीरा म्हणजेच १:३० ते २:३० च्या मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.  चंद्राशी संपर्क प्रस्थापित केल्यानंतर प्रज्ञान रोव्हर हे पहाटे ५:३० ते ६:३० वाजता लँडरमधून बाहेर येईल. 

इस्त्रोच्या चांद्रयान २ मिशनच्या बाबतीत एक अशी गोष्ट लक्षात येते की, जगभरातील अंतराळ एजन्सीच्या तुलनेत खूप कमी पैशात हे खूप कमी पैशात तयार करण्यात आलं आहे. हे यान फक्त ९७८ कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आलं आहे. जे खरं तर इतर अंतराळ एजन्सींच्या तुलनेने खूपच कमी आहे. 

नासासह इतर अंतराळ एजन्सींनी मागील काही काळात चंद्रावरच्या मिशनवर बरेच पैसे खर्च केले आहेत. नासाने आपल्या स्वत:च्या अपोलो मून मिशनवर तब्बल २५ बिलियन डॉलर एवढे पैसे खर्च केले होते. म्हणजेच तब्बल १२ अब्ज ५३ कोटी रुपये एवढे. 

कसं पाहाल चांद्रयान २ चं लाईव्ह स्ट्रीमिंग?

टाइम्स नाऊ चॅनलवर चांद्रयान २च्या लँडिंगचं लाइव्ह प्रसारण होणार आहे. जर आपण चांद्रयान लँडिंगचं थेट प्रसारण पाहू इच्छित असाल तर याचं लाइव्ह स्ट्रीम इस्त्रोची वेबसाइट isro.gov.in वर उपलब्ध असेल. जिथे टेलिकास्टसह आपल्याला थेट बंगळुरुचं सॅटेलाइट कंट्रोल सेंटर पाहता येणार आहे. हे स्ट्रिमिंग प्रेस माहिती ब्यूरो (पीआयबी) च्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहता येणार आहे. 

नॅशनल जिओग्राफिक चॅनलने देखील ही घोषणा केली आहे की, ते देखील लँडिंगचं थेट प्रसारण दाखवणार आहेत. पण हे काही साधारण प्रसारण असणार नाही. कारण की, चॅनलने नासाचे अंतराळ यात्री जेरी लिनेगर यांना निमंत्रित केलं आहे. जे प्रेक्षकांना लँडिग दरम्यानच अंतराळातील आपला अनुभव लाईव्ह टीव्हीवर सांगणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी