Chandrayaan 2: राष्ट्रपतींसह राहुल गांधी यांच्याकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक

चंद्राच्या दिशेनं आगेकूच करताना भारताच्या लॅंडर विक्रमशी त्याचा संपर्क तुटला आहे.चंद्राच्या 2.1 किलोमीटरजवळ पोहोचपर्यंत सर्व काही सामान्य होतं. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. राहुल गांधी,राष्ट्रपतींनी कौतुक केलं

Chandrayaan 2
Chandrayaan 2: राष्ट्रपतींसह राहुल गांधी यांच्याकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक 

थोडं पण कामाचं

  • चांद्रयान- 2चा लॅंडर विक्रमसोबत चंद्रावर पोहोचत असतानाच संपर्क तुटला.
  • देशवासिय आणि शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर निराशा
  • राष्ट्रपती म्हणाले:  शास्त्रज्ञांचा अभिमान आहे
  • राहुल गांधी म्हणालेः इस्रोने उत्तम काम केले

बंगळुरूः  चांद्रयान- 2चा लॅंडर विक्रमसोबत चंद्रावर पोहोचत असतानाच संपर्क तुटला. जेव्हा लँडर चंद्राच्या  2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला आहे.  लँडरशी संपर्क तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना सांगितले, "देशाला तुझा अभिमान आहे. चांगल्याची अपेक्षा करा. आयुष्यात चढ-उतार येत असतात. ही कोणतीही छोटी कामगिरी नाही. लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर आणण्याची प्रक्रिया सुमारे एक वाजण्याच्या सुमारास 38 मिनिटांनी सुरू झाली. 

देशवासिय आणि शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर निराशा

विक्रमनं 'रफ ब्रेकिंग' आणि 'फाइन ब्रेकिंग' स्तर यशस्वीरित्या पूर्ण केलं. मात्र 'सॉफ्ट लँडिंग' होण्यापूर्वी त्याचा पृथ्वीवरील स्टेशनशी संपर्क तुटला. त्यानंतर वैज्ञानिक आणि देशातील लोकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसली. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन काही वैज्ञानिकांशी सखोल चर्चा करताना दिसले.

त्यांनी जाहीर केले की 'विक्रम' लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर आणण्याची प्रक्रिया सुसंगत आणि सामान्य दिसत आहे. परंतु चंद्र पृष्ठभागापासून 2.1 किमी वर असताना ग्राउंड स्टेशनशी त्याचा संपर्क तुटला. डेटाचा अभ्यास केला जात आहे. नंतर इस्रोनं सांगितलं की, डेटाचा अभ्यास केला जात असून आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे.

राष्ट्रपती म्हणाले:  शास्त्रज्ञांचा अभिमान आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, देशाला इस्रोच्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. राष्ट्रपतींनी ट्विट केलं की, चांद्रयान -2 मिशन असलेल्या इस्रोच्या संपूर्ण पथकानं अपवादात्मक वचनबद्धता आणि धैर्य दाखविलं. देशाला इस्रोचा अभिमान आहे.  

तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, डॉ. हर्षवर्धन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही इस्रोच्या वैज्ञानिकांना निराश होऊ नये आणि तुमच्या कर्तृत्वाचा देशाला अभिमान असल्याचं म्हटलं.

राहुल गांधी म्हणालेः इस्रोने उत्तम काम केले

यासह कॉंग्रेसनं म्हटलं की, देश इस्रोच्या पाठीशी उभा आहे आणि त्याचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक करत म्हटलं की, शास्त्रज्ञांनी या मोहिमेवर एक चांगलं काम करत आणखी बऱ्याच महत्त्वाच्या आणि महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेचा पाया रचला आहे. 

राहुल गांधींनी ट्विट केलं की,  चांद्रयान -2 मिशनसाठी इस्त्रोच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन. आपला आत्मा आणि समर्पण प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहे. तुमचे काम व्यर्थ जाणार नाही. यामुळे बऱ्याच महत्त्वाच्या आणि महत्वाकांक्षी भारतीय अंतराळ मोहिमेचा पाया रचला गेला आहे. कॉंग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलं आहे की, संपूर्ण देश सध्या इस्रोच्या टीमसोबत उभा आहे. अंतराळ संस्थेच्या मेहनत आणि बांधिलकीनं देशाला अभिमान वाटला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी