D Gang: दाऊद इब्राहिम-छोटा शकीलविरुद्ध NIAची मोठी कारवाई

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, त्याचा जवळचा सहकारी छोटा शकील यांच्याविरोधातील आपली कारवाई तीव्र केली आहे.

chargesheet against dawood ibrahim chhota shakeel nia in action in terror funding case
D Gang: दाऊद इब्राहिम-छोटा शकीलविरुद्ध NIAची मोठी कारवाई (फाइल फोटो) 
थोडं पण कामाचं
  • दाऊद इब्राहिम, त्याचा जवळचा सहकारी छोटा शकीलविरोधात NIA ची कारवाई
  • 'डी कंपनी'च्या अन्य तीन सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल
  • संघटीत गुन्हेगारी कारवाया पुढे नेण्याचा रचला होता कट

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, त्याचा जवळचा सहकारी छोटा शकील आणि 'डी कंपनी'च्या अन्य तीन सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. एजन्सीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 'मुंबई आणि इतर भागात सनसनाटी दहशतवादी कारवाया करण्यासाठी निधी उभारणे.' याप्रकरणी कारवाई सुरु करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी फरार घोषित केलेले जागतिक दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि शकील यांच्याशिवाय एनआयएने नुकत्याच केलेल्या आरोपपत्रात आरिफ अबुबकर शेख उर्फ ​​आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट या तीन साथीदारांचीही नावे आहेत. (chargesheet against dawood ibrahim chhota shakeel nia in action in terror funding case)

एनआयएने दाखल केले आरोपपत्र 

एनआयएच्या तपासात सिद्ध झाले आहे की, आरोपी व्यक्ती जो डी-कंपनी, एक दहशतवादी टोळी आणि एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचे सदस्य असलेल्या आरोपींनी विविध प्रकारचे बेकायदेशीर कृत्ये करून संघटीत गुन्हेगारी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता.  

अधिक वाचा: मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी, नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिले धमकीचं पत्र

हा कट पुढे नेण्यासाठी, त्यांनी वैयक्तिक दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या फायद्यासाठी डी-कंपनीसाठी, धमक्या देऊन आणि लोकांना मृत्यूची किंवा गंभीर दुखापतीची भीती दाखवून मोठी रक्कम जमा केली. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हवाला माध्यमातून, परदेशात असलेल्या फरार किंवा वाँटेड आरोपींकडून, मुंबई आणि भारताच्या इतर भागांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवादी किंवा गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते, असेही सिद्ध झाले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये एनआयएने इब्राहिमवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

दाऊदवर यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे बक्षीस

पाकिस्तानातील कराची येथे राहणारा आणि 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसह भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी भारताला हवा असलेल्या कुख्यात दाऊद इब्राहिमवर 2003 साली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 25 दशलक्ष डॉलर्सचे इनाम देखील जाहीर केले आहे.

दाऊद इब्राहिम हा लष्कर प्रमुख हाफिज सईद, जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि जैश नंबर 2 अब्दुल रौफ असगरसह भारताच्या मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत आहे.

अधिक वाचा: Raigad News: कोंबड्यांची झुंज लावून लावला सट्टा, फायटर कोंबडे ताब्यात

एनआयएने यावर्षी फेब्रुवारीमध्ये इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला होता. ही माहिती मिळाल्यानंतर 'डी' कंपनीने इतर दहशतवादी गट आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था - ISIच्या मदतीने भारतात एक विशेष युनिट तयार केलं होतं.

तपासाचा एक भाग म्हणून, एनआयएने 29 ठिकाणी छापे टाकले होते. ज्यामध्ये हाजी अली दर्गा आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खांडवानी यांच्यासह अनेकांच्या घरासह महत्त्वाच्या ठिकाणी छापे मारण्यात आले होते.

मार्च 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी समीर हिंगोरा, शकील शेख उर्फ ​​छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा नातेवाईक गुड्डू पठाण आणि भिवंडीचा रहिवासी कय्यूम शेख यांना या वर्षी मे महिन्यात अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी