तीन हजार वर्षांपूर्वीच्या मंदिरात ३५ भुयारे

chavin de huantar temple, 35 tunnels found in 3000 year old Peruvian temple : पेरू या देशात तीन हजार वर्षांची परंपरा असलेल्या मंदिरात ३५ भुयारे आढळली. ही भुयारे पाहून इतिहासाचे अभ्यासक चक्रावले आहेत.

chavin de huantar temple, 35 tunnels found in 3000 year old Peruvian temple
तीन हजार वर्षांपूर्वीच्या मंदिरात ३५ भुयारे 
थोडं पण कामाचं
  • तीन हजार वर्षांपूर्वीच्या मंदिरात ३५ भुयारे
  • भुयारे पाहून इतिहासाचे अभ्यासक चक्रावले
  • आतापर्यंत इतिहासाच्या अभ्यासकांनी जे अभ्यासले आहे त्यापेक्षा एकदम वेगळ्या रचना जमिनीखाली आढळल्या

chavin de huantar temple, 35 tunnels found in 3000 year old Peruvian temple : मानवी संस्कृती सातत्याने प्रगती करत आहे. पण काही घटना अशा घडतात की ज्यांच्यामुळे प्राचीन काळात नेमके काय घडले आणि कसे घडले यावरून मनात प्रश्नांचे काहूर निर्माण होते. ताजी घटना पण अशीच आहे. पेरू या देशात तीन हजार वर्षांची परंपरा असलेल्या मंदिरात ३५ भुयारे आढळली. ही भुयारे पाहून इतिहासाचे अभ्यासक चक्रावले आहेत. मंदिरात एका कमासाठी खोदकाम सुरू होते. या खोदकामावेळी मजुरांना एक भुयार आढळले. यानंतर आणखी शोध घेतल्यावर तब्बल ३५ भुयारे असल्याचे लक्षात आले. 

जमिनीखाली भुयारांचे विस्तीर्ण जाळे आहे. जमिनीच्या खाली तब्बल ३५ रस्ते आढळले. हे सर्व रस्ते वेगवेळ्या ठिकाणी एकमेकांशी जोडले आहेत. जमिनीखाली आढळलेल्या अनेक रचना या पूर्णपणे अनभिज्ञ अशा स्वरुपाच्या आहेत. आतापर्यंत इतिहासाच्या अभ्यासकांनी जे अभ्यासले आहे त्यापेक्षा एकदम वेगळ्या रचना जमिनीखाली आढळल्या आहेत. यामुळे आपण ज्या गोष्टी जाणून घेत आहोत त्या पूर्णपणे नव्या आहेत आणि त्यांचा जमिनीवर असलेल्या मंदिराशी कोणताही संबंध नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

पेरूमध्ये अँडीज येथे चाविन डी हुंतार (Chavin de Huantar) नावाचे मंदिर आहे. हे मंदिर अँडिजच्या उत्तर मध्य भागात आहे. तीन  हजार वर्षांपूर्वी हा परिसर तत्कालीन संस्कृतीचे महत्त्वाचे धार्मिक आणि प्रशासकीय केंद्र होता. आज जे रस्ते जमिनीखाली आढळले आहेत ते रस्ते त्या काळात समुद्रसपाटीवर असावेत असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. रस्ते इसवी सन पूर्व १२०० ते इसवी सन पूर्व २०० या काळात तयार केल्याचे दिसते. हे रस्ते आज समुद्रतळापासून ३२०० मीटर उंचीवर आहेत. आजची समुद्रातील पाण्याची पातळी आणि त्यावेळची समुद्रातील पाण्याची पातळी असा विचार केल्यास रस्ते तेव्हा वापरात होते ही बाब समजून घेणे सोपे जाते. 

चाविन डी हुंतार या वास्तूला १९८५ मध्ये ऐतिहासिक वास्तू असा दर्जा मिळाला. पण या परिसरात आढळलेल्या भुयारांमुळे इतिहास अभ्यासक चकीत झाले आहेत. जमिनीखाली जे काही आहे ते एकदम वेगळे आहे आणि त्याची माहिती आजपर्यंत कोणालाही नव्हती; असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जमिनीखाली जे काही आढळले आहे त्याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. या अभ्यासातून अनेक नव्या गोष्टी कळण्याची शक्यता इतिहासाच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी