Chemical Factory Boiler Explosion: कारखान्यातील बॉयलरचा स्फोट, 12 जणांचा मृत्यू; PM मोदींकडून शोक व्यक्त

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर (Hapur) मध्ये केमिकल फॅक्टरीत मोठी दुर्घटना घडली आहे. हापूर बॉयलर (Boiler) स्फोटात अनेक कामगार होरपळले असून या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Boiler explosion in a factory, killing 12 people
कारखान्यातील बॉयलरचा स्फोट, 12 जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • फॉरेन्सिक आणि इतर पथके कारखान्यात लागलेल्या आगीचा तपास करत आहेत.
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचा कारखाना होता. पण आत काय चालले होते याचा शोध घेणं आवश्यक आहे- जिल्हा दंडाधिकारी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर (Hapur) मध्ये केमिकल फॅक्टरीत मोठी दुर्घटना घडली आहे. हापूर बॉयलर (Boiler) स्फोटात अनेक कामगार होरपळले असून या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हापूरच्या धौलाना पोलीस स्टेशनच्या UPSIDC ची ही घटना आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत. आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

कारखान्यात अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे. आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की, हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. या घटनेची माहिती देताना महानिरीक्षक (Inspector General) प्रवीण कुमार यांनी सांगितलं की, एका औद्योगिक युनिटमध्ये एक उपकरण कारखाना आहे, ज्याला इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी परवनागी देण्यात आली होती. फॉरेन्सिक आणि इतर पथके कारखान्यात लागलेल्या आगीचा तपास करत आहेत. अपघातात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. हापूरच्या जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate)  मेधा रुपम यांनी सांगितले की, हा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचा कारखाना होता. पण आत काय चालले होते हा तपासाचा विषय आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी आहेत.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

पीएम मोदींनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीएमओच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधानांनी लिहिलं की, उत्तर प्रदेशातील हापूर येथील रासायनिक कारखान्यातील दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. यामध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्यात राज्य सरकार सक्रिय आहे.

मुख्यमंत्री योगी यांनीही शोक व्यक्त केला

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असे लिहिले आहे की, मुख्यमंत्र्यांनी हापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात बॉयलरच्या स्फोटात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतानाच मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी