मातेने पोटच्या अल्पवयीन पोरीवर रेप करण्यासाठी प्रियकराला दिली परवानगी, २ अटकेत

Chennai: Mother allows her lover rape her minor daughter, hides teen pregnancy, 2 held : मातेने पोटच्या अल्पवयीन पोरीवर रेप करण्यासाठी प्रियकराला परवानगी दिली. या प्रकारात गरोदर राहिलेल्या मुलीने राहत्या घरीच बाळाला जन्म दिला.

Chennai: Mother allows her lover rape her minor daughter, hides teen pregnancy, 2 held
मातेने पोटच्या अल्पवयीन पोरीवर रेप करण्यासाठी प्रियकराला दिली परवानगी, २ अटकेत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मातेने पोटच्या अल्पवयीन पोरीवर रेप करण्यासाठी प्रियकराला दिली परवानगी, २ अटकेत
  • पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
  • पुरुषावर रेपचेही आरोप ठेवण्यात आले

Chennai: Mother allows her lover rape her minor daughter, hides teen pregnancy, 2 held : चेन्नई : एका धक्कादायक घटनेत मातेने पोटच्या अल्पवयीन पोरीवर रेप करण्यासाठी प्रियकराला परवानगी दिली. या प्रकारात गरोदर राहिलेल्या मुलीने राहत्या घरीच बाळाला जन्म दिला. बाळ आजारी पडले. उपचारासाठी बाळाला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले त्यावेळी सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करुन मुलीच्या मातेला अटक केली. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Ketaki Chitale : वाट पाहतो नरक, केतकी चितळेची शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल, ठाण्यात गुन्हा दाखल

'टाइम्स ऑफ इंडिया'ने या संदर्भातले सविस्तर वृत्त दिले आहे. ३८ वर्षांची महिला मोलमजुरी करून दिवस काढत होती. या महिलेची मुलगी ११वीत शिकत होती. महिलेचे एका पन्नाशीच्या व्यक्तीशी संबंध होते. संबंधित पुरुषाने महिलेच्या परवानगीने अल्पवयीन मुलीवर रेप केला. मुलगी गरोदर राहिली, तिने बाळाला जन्म दिला. महिलेने मुलीचे बाळंतपण घरातच केले होते. पण बाळ आजारी पडले आणि गडबड झाली. तब्येत खालावल्यामुळे बाळाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी चौकशी केली आणि संशय आल्यामुळे पोलिसांना बोलाविले. पोलीस आले आणि सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला. 

मुलगी रेपमुळे गरोदर राहिली. यानंतर तिच्या मातेने स्वतःच्या प्रियकराचे पोटच्या पोरीशी झटपट लग्न लावून दिले. मुलीचे शिक्षण बंद करण्यात आले. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून मुलीला कायम घरात राहण्याचे बंधन घालण्यात आले. ज्यावेळी मुलीला प्रसववेदना जाणवू लागल्या तेव्हा मुलीला बाथरूममध्ये नेण्यात आले. तिथेच मुलीने बाळाला जन्म दिला. बाळ आणि अल्पवयीन मुलगी घरातच असल्यामुळे शेजाऱ्यांना काहीही कळले नव्हते. पण बाळ आजारी पडले आणि सगळा प्रकार उघड झाला. 

बाळाची तब्येत बिघडल्यावर त्याला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नियमानुसार तिथल्या प्रशासनाने बाळाची तसेच त्याच्या आईवडिलांची माहिती नोंदणीसाठी मागितली. महिलेने वेळ मारून नेण्यासाठी स्वतःचे आधारकार्ड सादर केले. हा प्रकार पाहून प्रशासनाला आणि डॉक्टरांना संशय आला. तातडीने पोलिसांना आणि स्थानिक बाल कल्याण समितीला माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीच्या मातेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांविरोधात  (Protection of Children from Sexual Offences - POCSO) पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषावर रेपचेही आरोप ठेवण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी