Chennai Rain Weather Updates: तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक भागांमध्ये रेड अलर्ट

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 11, 2021 | 13:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chennai Rain Weather Updates: बंगालच्या खाडीत दबावाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तामिळनाडूच्या काही भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. 

tamilndu rain
तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, रेड अलर्ट जारी 
थोडं पण कामाचं
  • तामिळनाडूमध्ये प्रचं पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
  • आजही हवामान विभागाने काही भागांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे 
  • चेन्नईचे अनेक भाग जलमय झाले असून सामान्य लोकांना खूप त्रास होत आहे. 

चेन्नई:भारतीय हवामान खात्याने  (IMD)आजही उत्तर चेन्नई(North chennai) तिरूवल्लूर, चेंगलपेट, विल्लुपुरम, कांचीपुरम, रानीपेट आणि कुड्डालोर जिल्ह्यांसहित तामिळनाडूच्या(tamilnadu) काही भागांमध्ये मुसळधार पावसाची(heavy rain) शक्यता वर्तवत रेड अलर्ट(red alert) जारी केला आहे. आपल्या नव्या बुलेटिनमद्ये भारतीय हवामान विभागाने(imd) म्हटले की मोसमी वारे ४ किमी प्रति तासाच्या वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिमच्या दिशेने वाढत होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी पुड्डुचेरीच्या उत्तरेला जवळ कराईकल आणि श्री हरिकोटा यांच्यात उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांना पार करण्याची शक्यता आहे ज्यानंतर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. Chennai rain weather update imdb today life disturb due to heavy rain in tamilnadu

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील २४तास तामिळनाडूसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. चेन्नईच्या कोडंबक्कम आणि अशोक नगर भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी भरले आहे. 

चेन्नईत तुफान पाऊस

चेन्नईच्या अनेक रस्त्यांवर गुरूवारी पाणी भरले. ट्रॅफिक पोलिसांनी कमीत कमी सात रस्ते आणि ११सबवे बंद केले आहेत आणि प्रवाशांसाठी शहरभरात डायव्हर्जन केले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने काही उपनगरीय रेल्वे निलंबित करण्यात आल्या आहेत तर काही उशिराने सुरू आहेत. भारतीय हवाई उड्डाण प्राधिकरणाने सांगितले की उड्डाणे सामान्य आहेत आणि प्रतिकूल हवामानामुळे विमानतळांवर विशेष व्यवस्था केली जात आहे. चेन्नईच्या केकेनगर स्थित ईएसआय रूग्णालयात पावसाचे पाणी घुसले आहे. दरम्यान, ओपीडीसह सर्व सुविधा सुरू आहेत. ESI हॉस्पिटलचे डॉ. महेश यांच्या मते कोविड वॉर्डसहित रुग्णालयाचे वॉर्ड प्रभावित झालेले नाहीत. 

अलर्ट जारी

हवामान विभागाने सांगितले की दबावाचे क्षेत्र निर्माण झाल्याने उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्या ११ नोव्हेंबरला संध्याकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर १२ नोव्हेंबरला निलगिरी पर्वतरांगा, कोईम्बतूर, सेलम, तिरूपत्तूर आणि वेल्लोरमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.. तामिळनाडूमध्ये पूर्वोत्तर मान्सूनमुळे एक ऑक्टोबरपासून सामान्य ते ५० टक्क्यापर्यंत पाऊस झाला आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी