Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असा असेल आजचा दिल्ली दौरा, खासदारांबाबत केलं महत्त्वाचं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर (Delhi) आहेत.

cm Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल झाले.
  • बुधवारी सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
  • आज दुपारी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री आणि सर्व खासदार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: राज्यातल्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर (Delhi) आहेत. शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल झाले. शिंदे या दौऱ्या दरम्यान वकिलांची भेट घेणार असल्याचंही समजतंय. बुधवारी सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

कसा असेल एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
  • आज दुपारी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री आणि सर्व खासदार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदे खासदारांसोबत खास डिनर 

दिल्लीत दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर खासदारांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण सोबत केलं. त्यामुळे आमदारांनंतर खासदार ही शिंदे गटात सामील होण्याच्या वाटेवर असल्यानं उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. 

अधिक वाचा-  अमरावतीत कार- बाईकची जोरदार धडक; अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू; एक जखमी

डिनरला 'या' खासदारांची उपस्थिती 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत रात्रीच्या जेवणासाठी कृपाल तूमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने,राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे,भावना गवळी, संजय मंडलिक,श्रीकांत शिंदे यांच्यासह 12 खासदार उपस्थित होते. त्यामुळे शिंदे गटात सामील होऊन हे 12 आमदार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीत उपस्थित असलेले खासदार आणि एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची भेट ही घेऊ शकतात.

पत्रकार परिषद होण्याची शक्यता 

आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी बंडखोर खासदार जाणार असल्याचं समजतंय. याभेटी दरम्यान राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय.. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचं पत्र खासदार ओम बिर्ला यांच्याकडे देणार आहेत. या घडामोडीनंतर आज दुपारी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व खासदार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. 

खासदारांबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? 

शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही त्यांनी सांगितलं. 

उद्या सुप्रीम कोर्टात निकाल

शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर (MLA)  कारवाई करण्याबाबत शिवसेनेनं (Shiv Sena)  सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या दाखल याचिकेवर येत्या बुधवारी म्हणजेच 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.  सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होणार आहे.  शिवसेना आमदारांच्या बंडखोरीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 20 जुलै रोजी सुनावणी होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्ट याप्रकरणी काय निरीक्षणे नोंदवते आणि काय निकाल देते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी