पश्चिम बंगालमध्ये झाडाजवळ बॉम्ब, मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला आणि जखमी झाली

children injured in crude bomb explosion in West Bengal Malda : पश्चिम बंगालमधील मालदामध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात पाच मुले जखमी झाली.

children injured in crude bomb explosion in West Bengal Malda
पश्चिम बंगालमध्ये झाडाजवळ बॉम्ब, मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला आणि जखमी झाली  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पश्चिम बंगालमध्ये झाडाजवळ बॉम्ब, मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला आणि जखमी झाली
  • मालदातील घटना
  • पोलीस तपास सुरू

children injured in crude bomb explosion in West Bengal Malda : मालदा : पश्चिम बंगालमधील मालदामध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात पाच मुले जखमी झाली. क्रिकेटच्या बॉलसारखा दिसणारा बॉम्ब आंबा बागेत झाडांजवळ पडला होता. बॉल समजून मुलांनी तो बॉम्ब उचलला आणि स्फोट झाला. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या पाच मुलांना जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. 

प्राथमिक माहितीनुसार जखमी झालेली मुले आंबा बागेत खेळत होती. खेळताना त्यांना झाडांजवळ क्रिकेटच्या बॉलसारखी वस्तू दिसली. ही वस्तू बॉल समजून मुलांनी हातात घेतली आणि स्फोट झाला. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी