Vijaypat Singhania आईवडिलांच्या मृत्यूनंतरच संपत्ती मुलांना मिळायला हवी - विजयपत सिंघानिया

Vijaypat Singhania रेमंड समुहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांनी त्यांची आत्मकथा 'अॅन इनकम्प्लीट लाइफ' या नावाने प्रसिद्ध केली आहे. यात विजयपत सिंघानिया त्यांना आयुष्यातील काही घडामोडींनी दिलेल्या मोठ्या धड्याविषयी नमूद केले आहे.

Children Should Get Their Property Only After The Death Of Parents Vijaypat Singhania
आईवडिलांच्या मृत्यूनंतरच संपत्ती मुलांना मिळायला हवी - विजयपत सिंघानिया 
थोडं पण कामाचं
  • आईवडिलांच्या मृत्यूनंतरच संपत्ती मुलांना मिळायला हवी - विजयपत सिंघानिया
  • विजयपत सिंघानिया यांची आत्मकथा 'अॅन इनकम्प्लीट लाइफ' या नावाने प्रसिद्ध
  • कोणत्याही आईवडिलांवर ते दुःख सहन करण्याची वेळ येऊ नये जी वेळ माझ्यावर आली - विजयपत सिंघानिया

Children Should Get Their Property Only After The Death Of Parents Vijaypat Singhania । नवी दिल्ली: रेमंड समुहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांनी त्यांची आत्मकथा 'अॅन इनकम्प्लीट लाइफ' या नावाने प्रसिद्ध केली आहे. यात विजयपत सिंघानिया त्यांना आयुष्यातील काही घडामोडींनी दिलेल्या मोठ्या धड्याविषयी नमूद केले आहे.

आईवडिलांच्या मृत्यूनंतरच संपत्ती मुलांना मिळायला हवी, असे विजयपत सिंघानिया यांचे स्पष्ट मत आहे. हे मत त्यांनी आत्मकथनात व्यक्त केले आहे. कौटुंबिक कलहानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये विजयपत सिंघानिया यांना रेमंड समुहातील अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांचे वडिलोपार्जित घर सोडावे लागले होते. गमावलेल्या गोष्टी परत मिळवण्यासाठी आजही विजयपत सिंघानिया यांचा संघर्ष सुरू आहे. या अनुभवामुळेच आईवडिलांच्या मृत्यूनंतरच संपत्ती मुलांना मिळायला हवी, असे ठाम मत झाल्याचे विजयपत सिंघानिया सांगतात. कोणत्याही आईवडिलांवर ते दुःख सहन करण्याची वेळ येऊ नये जी वेळ माझ्यावर आली आहे, असेही विजयपत सिंघानिया यांनी सांगितले. 

विजयपत सिंघानिया यांची आत्मकथा पॅन मॅकमिलन इंडिया या प्रकाशन संस्थेने पुस्तकाच्या रुपात बाजारात आणली आहे. या पुस्तकात विजयपत सिंघानिया यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. कौटुंबिक कलहानंतर मला माझी मुंबई आणि लंडनमधील कार वापरता येत नाही. स्वतःच्या घरात राहता येत नाही. रेमंड समुहाचा अध्यक्ष म्हणून काम करता येत नाही. मला माझ्या सचिवाला आणि कंपनीतील सहकाऱ्यांना भेटता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत कंपनीशी संबंधित कोणीही थेट माझी भेट घेऊ नये यासाठी आदेश दिले गेले आहेत. मला अनेक महत्त्वाची कागदपत्रे बघण्यापासून रोखण्यात आले आहे. मला माझे आवडते काम करणे आता शक्य नाही, असेही विजयपत सिंघानिया यांनी सांगितले.

याआधी सिंघानिया कुटुंबात जन्मलेल्या विजयपत सिंघानिया यांनी फक्त कुटुंबाचा व्यवसाय सांभाळावा, अशी घरातल्या काही व्यक्तींची इच्छा होती. पण सिंघानिया यांनी त्यांच्या आवडीनुसार काम केले. पायलट म्हणून आकाशात दोन विक्रमांची नोंद केली. प्रोफेसर म्हणून काम केले. मुंबईचे शेरिफ म्हणून एक वर्ष काम केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी