Bhopal Kamla Nehru Hospital Fire : भोपळमधील कमला नेहरू रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डला आग; 4 बालकांचा मृत्यू , 36 मुलांना वाचवण्यात यश

Bhopal Fire At Kamla Nehru Hospital : भोपाळच्या (Bhopal) कमला नेहरू रुग्णालयातील (Kamla Nehru Hospital) मुलांच्या वॉर्डमध्ये (Children's ward) आग लागल्याची घटना  सोमवारी रात्री  घडली. अग्निशमन दलाने (Fire brigade) घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Children's ward fire at Kamla Nehru Hospital in Bhopal
भोपळमधील कमला नेहरू रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डला आग  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
  • सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती.
  • ज्या पालकांनी आपल्या बालकांना गमावले आहे, त्यांना नुकसान भरपाई म्हणून 4-4 लाख रुपये देण्यात येणार.

Bhopal Fire At Kamla Nehru Hospital : भोपाळच्या (Bhopal) कमला नेहरू रुग्णालयातील (Kamla Nehru Hospital) मुलांच्या वॉर्डमध्ये (Children's ward) आग लागल्याची घटना  सोमवारी रात्री  घडली. अग्निशमन दलाने (Fire brigade) घटनास्थळी दाखल होत  आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री (Medical Education Minister) विश्वास सारंग (Vishwas Sarang) घटनास्थळी स्वत: उपस्थित होते. या घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक मुले जखमी झाली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या वार्डात आग लागली तेथे 24 बालके उपचारासाठी दाखल होती. आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितले जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. फतेहगड अग्निशमन केंद्राचे प्रभारी जुबेर खान यांनी सांगितले की, सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या सुमारे 12 गाड्या घटनास्थळी पोहोचून त्यांनी आग आटोक्यात आणण्यात आली.या घटेनेला दुजोरा देत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट केले की, “रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. बचावकार्य वेगाने झाले पाहिजे. आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु दुर्दैवाने गंभीर आजारामुळे दाखल झालेल्या तीन मुलांना वाचवता आले नाही.”

 मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये झालेली आगीची घटना दुःखद आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मोहम्मद सुलेमान हे याचा तपास करणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी या घटनेविषयी सांगितले की, ज्या वार्डात आग लागली होती होती, तेथे 40 बालके उपचारासाठी दाखल होती.

ज्यातील 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीच्या 36 बालकांना वाचवून दुसऱ्या वार्डात शिफ्ट करण्यात आले आहे. ज्या पालकांनी आपल्या बालकांना गमावले आहे, त्यांना नुकसान भरपाई म्हणून 4-4 लाख रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील भंडाऱ्यात देखील काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. 9 जानेवारीला मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात बाकांचा होरपळून मृत्यू झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी