चीनच्या नागरिकांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानी दहशतवादावर भडकला चीन, पाकिस्तानला दिली धमकी

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 19, 2021 | 11:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर चीनचा ड्रॅगन आपल्या जिवलग मित्रावर भडकला आहे. बसमध्ये झालेला स्फोट हा गॅसगळतीमुळे झाल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानची चीनने कानउघडणी केली आहे.

Pakistan and China
चीनच्या नागरिकांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानी दहशतवादावर भडकला चीन, पाकिस्तानला दिली धमकी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • चीनच्या मुखपत्राचे संपादक पाकिस्तानवर भडकले
  • पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिले पूर्ण चौकशीचे आश्वासन
  • कामगारांना नेणाऱ्या बसमध्ये स्फोट, 13 मृत्यूमुखी

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या (Pakistan) दहशतवादी हल्ल्यात (terrorist attack) चिनी नागरिकांचा (Chinese citizens) मृत्यू (death) झाल्यानंतर चीनचा ड्रॅगन (Chinese dragon) आपल्या जिवलग मित्रावर (close friend) भडकला आहे. बसमध्ये (bus) झालेला स्फोट (blast) हा गॅसगळतीमुळे (gas leakage) झाल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानची चीनने कानउघडणी केली आहे. चीनने म्हटले आहे की जर त्यांना दहशतवाद्यांचा (terrorists) सामना करता येत नसेल तर चीन आपल्या सैनिकांना (army) क्षेपणास्त्रांसह (missiles) मोहिमेवर पाठवू शकतो. याआधी चीनने दहशतवादाच्या (terrorism) विषयावर पाकिस्तानची हरप्रकारे पाठराखण (support) केली आहे. संयुक्त राष्ट्रात (United Nations) मसूद अजहरला (Masood Azhar) जागतिक दहशतवादी (global terrorist) म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या (India) प्रयत्नांमध्येही (attempts) चीनने अडथळे (hurdles) आणले होते.

चीनच्या मुखपत्राचे संपादक पाकिस्तानवर भडकले

चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या संपादकांनी एक ट्वीट करत म्हटले आहे, ''या हल्ल्यात सामील असलेले भ्याड दहशतवादी अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र त्यांना नक्कीच शोधून काढले जाईल आणि त्यांना संपवून टाकण्यात यावे. जर पाकिस्तानची क्षमता पुरेशी नसेल तर त्यांच्या मंजुरीने चीनची क्षेपणास्त्रे आणि विशेष पथकांना हे काम देता येऊ शकते.'' त्यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे जेव्हा बीजिंगने म्हटले आहे की पाकिस्तानच्या वायव्य भागात एका बसमध्ये स्फोट होऊन त्यात चीनच्या 9 कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. मात्र इस्लामाबादने या घटनेमागे गॅस गळतीचे कारण दिले आहे. चीनने या तपासावर अविश्वास दाखवत म्हटले आहे की चीन तिथे आपले तपास पथक पाठवेल.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिले पूर्ण चौकशीचे आश्वासन

यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी शुक्रवारी चीनच्या ली कचियांग यांना आश्वासन दिले की बस स्फोटाची पूर्ण चौकशी केली जाईल. त्यांनी म्हटले आहे की शत्रू देशांना दोन देशांमधल्या मैत्रीच्या संबंधांना धक्का लावण्याची सूट दिली जाणार नाही. त्यांनी या घटनेबद्दल दुःखही व्यक्त केले आहे. त्यांनी ली यांच्याशी फोनवर बोलताना म्हटले की या प्रकरणाच्या तपासात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही आणि पाकिस्तानात चीनचे नागरिक, कामगार आणि संस्थांची सुरक्षा त्यांच्या सरकारची उच्च प्राथमिकता आहे.

कामगारांना नेणाऱ्या बसमध्ये स्फोट, 13 मृत्यूमुखी

दासू धरणाच्या बांधणीसाठी चीनचे अभियंते आणि कामगारांना घेऊन जात असलेल्या या बसमध्ये स्फोट होऊन 9 चिनी नागरिकांसह फ्रंटियर कोरचे दोन जवान यांच्यासह किमान 13 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि इतर 39 लोक जखमी झाले आहेत. एका सरकारी वक्तव्यानुसार खान यांनी म्हटले आहे की पाकिस्तान आणि चीनदरम्यान घट्ट मैत्री आहे जी काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी