China vs India चीनने १९५९ मध्ये भारताच्या हद्दीत वसवले एक गाव

China built a village inside inside Indian territory अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी संबंधित एका अहवालानुसार चीनने १९५९ मध्ये भारताच्या हद्दीत अरुणाचल प्रदेश येथे एक शंभर घरांचे गाव वसवले आहे. हे गाव आजही त्याच ठिकाणी आहे.

China built a village inside inside Indian territory
चीनने १९५९ मध्ये भारताच्या हद्दीत वसवले एक गाव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चीनने १९५९ मध्ये भारताच्या हद्दीत वसवले एक गाव
  • शंभर घरांचे गाव वसवले
  • चीनने १९५९ मध्ये भारताच्या हद्दीत अरुणाचल प्रदेश येथे केली घुसखोरी

China built a village inside inside Indian territory । वॉशिंग्टन: अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी संबंधित एका अहवालानुसार चीनने १९५९ मध्ये भारताच्या हद्दीत अरुणाचल प्रदेश येथे एक शंभर घरांचे गाव वसवले आहे. हे गाव आजही त्याच ठिकाणी आहे. भारत-चीन यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चेतून तोडगा निघाला तर या गावाचे पुढे काय करायचे हे ठरेल. पण सध्या हे शंभर घरांचे चिनी गाव आजही अरुणाचल प्रदेशमध्ये भारताच्या हद्दीत आहे.

(ग्राफिक्सच्या मदतीने दाखविलेले गाव. हा अधिकृत नकाशा नाही)

चिनी गाव अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यात आहे. हे चिनी गाव म्हणजे चीनने भारतात केलेली घुसखोरी आहे. पण चर्चेतून तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे भारत सरकारने ही घुसखोरी हटविण्यासाठी आतापर्यंत कठोर पावले उचलली नाहीत.

मागील काही वर्षांत चीनने भारतावर दबाव टाकण्यासाठी मुद्दाम प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ स्वतःच्या हद्दीत लहान-मोठी गावं वसविण्याचा उद्योग सुरू केला आहे. पण ही गावं चिनी हद्दीत आहेत. चीनने भारताच्या हद्दीत सुबनसिरी जिल्ह्यात घुसखोरी करुन शंभर घरांचे चिनी गाव वसविले आहे.

चिनी डावपेचांना उत्तर देण्यासाठी भारत सरकारने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं सुरू केली आहेत. यात मोठे रस्ते, पूल यांच्या निर्मितीची कामं आहेत. ही कामं वेगाने सुरू आहेत. 

लडाख ते अरुणाचल प्रदेश या पट्ट्यात भारत-चीन दरम्यान ३४८८ किमी. ची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पसरली आहे. चीन अनेकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघुन करुन भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय जवान हे प्रयत्न हाणून पाडतात. हा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. या संघर्षावर अद्याप तोडगा निघालेला नाही; असेही अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालात स्पष्ट नमूद आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी