चीनच्या खोड्या अद्याप सुरूच, आधी भारताला दिली मदतीची ऑफर, आता कोरोनावरून केली चेष्टा

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या लाजिरवाण्या पोस्टच्या आधी एकच दिवस चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात कोरोनाशी लढाईत भारताला शक्य ती मदत देण्याचे म्हटले होते.

Chinese President Xi Jinping
चीनच्या खोड्या अद्याप सुरूच, आधी भारताला दिली मदतीची ऑफर, आता कोरोनावरून केली चेष्टा 

थोडं पण कामाचं

  • आपले रॉकेट आणि भारतात जळत असलेल्या चितांचा फोटो शेअर
  • कॅप्शनमध्ये कोरोना मृतांबद्दल भारताला मारला टोमणा
  • कोरोनाविरुद्धच्या लढाईत चीनने भारताला मदतीचा हात हात

बीजिंग: कोरोना व्हायरसच्या (Corona virus) या संकटाच्या काळातही चीनच्या (China) कुरापती (notorieties) सुरूच आहेत. एकीकडे भारताला (India) मदत (help) करण्याची तयारी चीनने दाखवली आहे तर दुसरीकडे भारताची चेष्टा (mockery) केली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party of China) शक्तिशाली विंगने (powerful wing) नुकतीच सोशल मीडियावर (social media) भारताची चेष्टा करणारी पोस्ट (post) शेअर (share) केली. याद्वारे बीजिंगने (Beijing) सांगितले की भारतात कोरोनामुळे चिता (piers) जळत आहेत आणि चीन विकासाच्या (development) दिशेने पावले टाकत आहे.

Weiboवर शेअर केला जळणाऱ्या चितांचा फोटो

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या बातमीनुसार चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या कमिशन फॉर पॉलिटिकल अँड लीगल अफेअर्स विंगने चीनचे ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीबोवर दोन फोटो शेअर केले आहेत ज्यापैकी एकात चीन रॉकेट लाँच करताना दिसत आहे आणि दुसरीकडे कोरोनामुळे भारतात होणाऱ्या मृत्यूंमुळे जळणाऱ्या चिता दिसत आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘चीन विरुद्ध भारत, जेव्हा चीन कोणत्याही गोष्टीत पुढे जाताना दिसत आहे तेव्हा भारत हे करत आहे.’

डाँग यांनी समोर आणली चीनची खोडी

लंडनमधील पत्रकार मेंगयू डाँग यांनी चीनची ही खोडी जगासमोर आणली आहे. त्यांनीच या फोटोंचे एक कोलाज ट्वीट करत म्हटले आहे की एकीकडे मदतीच्या गोष्टी करणारे बीजिंग भारतविरोधी विचार करत आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘‘कुणालातरी असे वाटत आहे की भारतात कोरोनाच्या विस्फोटाबद्दलही टिंगल करणे हा एक चांगला विचार आहे. सीसीपी सेंट्रल पॉलिटिकल अँड लीगल अफेअर्स कमिशनशी संबंधित खात्याने वीबोवर ही पोस्ट केली आहे.”

जिनपिंग यांनी व्यक्त केली होती चिंता

बीजिंगवर नजर ठेवणाऱ्या चीनच्या डिजिटल टाईम्सचे म्हणणे आहे की चीनचे पोलीस ऑनलाईन आणि तियांजीन म्यूनिसिपल प्रॉक्यूरेटर यासारख्या अधिकृत खात्यांनी कोरोना संकटाच्या विरोधातल्या भारताच्या लढाईची टर उडवत अनेक मंचांवर फोटो पोस्ट केले आहेत. महत्वाची गोष्ट ही की सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या लाजिरवाण्या पोस्टच्या आधी एकच दिवस चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात कोरोनाशी लढाईत भारताला शक्य ती मदत देण्याचे म्हटले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी