चीन लढाईच्या तयारीत, LACवर सज्ज केले १००पेक्षा जास्त अॅडव्हान्स रॉकेट लाँचर

चीन भारताशी लढाई करण्याची तयारी करत आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शंभरपेक्षा जास्त अॅडव्हान्स लाँग रेंज रॉकेट लाँचर आणि १५५ मिमी कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा सज्ज केल्या आहेत.

China Deploys 100 Advanced Rocket Launchers, Pcl-181 Howitzer On Indian Border, Preparing For War
चीन लढाईच्या तयारीत, LACवर सज्ज केले १००पेक्षा जास्त अॅडव्हान्स रॉकेट लाँचर 
थोडं पण कामाचं
  • चीन लढाईच्या तयारीत, LACवर सज्ज केले १००पेक्षा जास्त अॅडव्हान्स रॉकेट लाँचर
  • LACवर सज्ज चिनी सैन्याच्या १५५ मिमी कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा
  • भारताने चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी केली तयारी

बीजिंग: चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि काही महिन्यांत संपूर्ण जगाला कोरोना संकटाने घेरले. या संकटातून सावरत असलेल्या जगासमोर चीनमुळे नवे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. चीन भारताशी लढाई करण्याची तयारी करत आहे. ही लढाई झाली तर जगातील सुमारे एक तृतियांश लोकसंख्या नव्या संकटाला सामोरी जाईल आणि या लढाईत अन्य देश ओढले गेल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याचा धोका आहे. China Deploys 100 Advanced Rocket Launchers, Pcl-181 Howitzer On Indian Border, Preparing For War

गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी बलिदान दिले पण देशाच्या ताब्यातील भूभाग सुरक्षित राखला. या संघर्षामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (Line of Actual Control - LAC) शंभरपेक्षा जास्त अॅडव्हान्स लाँग रेंज रॉकेट लाँचर आणि १५५ मिमी कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा सज्ज केल्या आहेत. चिनी सैन्याच्या हालचालींची दखल घेऊन भारतीय सैन्याने तीन रेजिमेंट तैनात केल्या आहेत तसेच एम ७७७ अल्ट्रा लाइट हॉवित्झर तोफांचा ताफा सज्ज ठेवला आहे. 

चीनने लडाखनजीक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पीएचएल ०३ लाँग रेंज मल्टिपल रॉकेट लाँचरची दहा युनिट सज्ज ठेवली आहेत. या युनिटचा कारभार सुरळीतरित्या चालवण्यासाठी प्रत्येक युनिटसोबत चार जवानांची तुकडी आहे. चिनी युनिटमध्ये ३०० मिमी.च्या बारा लाँचर ट्युब आहेत. प्रत्येक ट्युबमधून ६५० किमी पर्यंत पल्ला असलेली ताशी ६० किमी वेगाने उड्डाण करणारी रॉकेट हल्ल्यासाठी सज्ज ठेवली असल्याचे वृत्त आहे. 

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पीसीएल १९१ रॉकेट लाँचर पण सज्ज ठेवले आहे. या सिस्टिमच्या प्रत्येक ट्युबमधून ३५० किमी पर्यंत पल्ला असलेली ताशी ६० किमी वेगाने उड्डाण करणारी रॉकेट हल्ल्यासाठी सज्ज ठेवली असल्याचे वृत्त आहे. प्रत्येक युनिटमध्ये ३७० मिमी.च्या आठ लाँचर ट्युब आहेत.

चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ १५५ मिमी कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा सज्ज केल्या आहेत. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार १०० पेक्षा जास्त तोफा चीनने सज्ज ठेवल्या आहेत. या तोफांची क्षमता भारतीय तोफांपेक्षा दुप्पट असल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला आहे. तसेच लडाख जवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ १२२ कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा सज्ज केल्या असल्याचेही चिनी माध्यमांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी