China stock up household चीनमध्ये घरोघरी सुरू आहे साठेबाजी, युद्ध किंवा मोठ्या लॉकडाऊनची तयारी

China has asked its people to stock up household supplies । चीन सरकारने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर खाण्याचे पदार्थ, हवाबंद पाकिटातले खाण्याचे पदार्थ, पाणी आणि इतर घरगुती वापराच्या वस्तूंची साठेबाजी करण्याची सूचना दिली आहे.

China has asked its people to stock up household supplies
चीनमध्ये घरोघरी सुरू आहे साठेबाजी, युद्ध किंवा मोठ्या लॉकडाऊनची तयारी 
थोडं पण कामाचं
  • चीनमध्ये घरोघरी सुरू आहे साठेबाजी, युद्ध किंवा मोठ्या लॉकडाऊनची तयारी
  • काही तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांच्या प्रतिकूल हवामानाचा विचार करुन साठेबाजी करण्याच्या सूचना दिल्याची शक्यता
  • काही तज्ज्ञांना कोरोनापेक्षा भयानक अज्ञात संकटाची चिंता सतावत आहे

China has asked its people to stock up household supplies । बीजिंग: चीन सरकारने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर खाण्याचे पदार्थ, हवाबंद पाकिटातले खाण्याचे पदार्थ, पाणी आणि इतर घरगुती वापराच्या वस्तूंची साठेबाजी करण्याची सूचना दिली आहे. चीन सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना ही सूचना दिली आहे. प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून चीनमधील दुकानांमध्ये, मॉलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. प्रत्येकजण साठेबाजी करण्यात गुंतले आहे. यामुळे चीन युद्ध किंवा मोठ्या लॉकडाऊनची तयारी करत असल्याची चर्चा आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांच्या प्रतिकूल हवामानाचा विचार करुन साठेबाजी करण्याच्या सूचना दिल्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांना मात्र कोरोनापेक्षा भयानक अज्ञात संकटाची चिंता सतावत आहे.

चीनमध्ये कोरोना संकट सुरू झाले, लॉकडाऊन करावे लागले पण त्यावेळी सरकारी यंत्रणेने साठेबाजीची सूचना दिली नव्हती. सरकारी यंत्रणा साठेबाजीच्या विरोधात असते. पण सध्या चीनमध्ये सरकारी यंत्रणाच साठेबाजीला प्रोत्साहन देत आहे. साठेबाजी करा; असे सांगताना चीन सरकारने कारण जाहीर केलेले नाही. यामुळेच चर्चेला उधाण आले आहे.

पुढील काही दिवसांत चीनमधील काही शहरांच्या तापमानात दहा ते वीस अंश से. एवढी मोठी घट होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ देत आहेत. या प्रतिकूल हवामानाचा विचार करुन चीन सरकारने साठेबाजी करण्यास सांगितल्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही दशकांपूर्वी चीनमध्ये अन्नधान्याच्या टंचाईमुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला होता. या संकटाची भीती आजही प्रत्येक चिनी नागरिकाच्या मनात घर करुन बसली आहे. यामुळेच प्रतिकूल हवामानामुळे शेती उत्पादनांवर परिणाम झाला तर लोकांची नाराजी सहन करावी लागू नये यासाठी चीन सरकारने आधीपासूनच साठेबाजीला प्रोत्साहन दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण कोरोना संकटात लोकांना जबरदस्तीने घरात कोंडणारे आणि दरवाजांवर धातूच्या आणि लाकडाच्या पट्ट्या खिळे ठोकून घट्ट बसविणारे चीन सरकार प्रतिकूल हवामानाचा विचार करुन साठेबाजीला प्रोत्साहन देईल ही शक्यता अनेकांना पचनी पडलेली नाही. 

कोरोनाची मोठी लाट येण्याची अथवा अन्य एखादा गंभीर संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता विचारात घेऊन देशव्यापी लॉकडाऊनची तयारी चीन करत असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तर काही जणांनी चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चीन सरकारने साठेबाजीला प्रोत्साहन देण्यामागील खरे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पण साठेबाजीला प्रोत्साहन देणारे प्रसिद्धीपत्रक निघाल्यापासून जगातील अनेक देशांचे कान टवकारले आहेत. याआधी चीनने भारतावर हल्ला करण्याआधी भारतातून मोठ्या प्रमाणावर तांदूळ आयात केला होता. आता अन्नधान्याच्या बाबतीत चीन स्वयंपूर्ण आहे. यामुळे आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी चीन सरकारने उपलब्ध साठ्याचीच साठेबाजी करायला नागरिकांना सांगितल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चीन सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात हवाबंद पाकिटातल्या पदार्थांचा साठा करा; अशा स्वरुपाचीही सूचना आहे. यामुळेच चीनचा उद्देश युद्ध किंवा मोठ्या लॉकडाऊनची तयारी असल्याची चर्चा जोरात आहे. चिनी प्रसिद्धीपत्रकाची माहिती मिळाल्यापासून जगभरातील गुप्तचर यंत्रणा आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी