चीनने अनेकदा केला आहे भारतीय उपग्रहांवर सायबर हल्ला, अहवालात दावा

१४२ पानांच्या या अहवालात म्हटले आहे की २०१२ ते २०१८ यादरम्यान चीनकडून अनेक सायबर हल्ले करण्यात आले आहेत. पण या अहवालात केवळ एकाच सायबर हल्ल्याबाबत तपशीलवार सांगण्यात आले आहे.

Chinese cyber attacks on Indian satellites
चीनने अनेकदा केला आहे भारतीय उपग्रहांवर सायबर हल्ला, अहवालात दावा  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • अमेरिकी अहवालात दावा- भारतीय उपग्रहांवर सायबर हल्ल्याचे झाले प्रयत्न
  • चीनकडून २००७पासून २०१८पर्यंत झाले उपग्रहांवर हल्ल्याचे प्रयत्न
  • रिपोर्टमध्ये केला दावा की चीनकडे आहे अधिक चांगले काऊंटर स्पेस तंत्रज्ञान

नवी दिल्ली: भारताविरुद्ध कारस्थान रचण्याची (Conspiracy against India) आणि अंतराळ सुरक्षा तंत्रज्ञान (space security) आणि मोहिमा (space missions) कमजोर करण्याची चीनची (Chinese conspiracy) आणखी एक योजना उजेडात आली आहे. एका अमेरिकी अहवालानुसार (American report) चीनकडून २००७पासून २०१७ यादरम्यान भारतीय संचार उपग्रहांवर (Indian communication satellites) सायबर हल्ला (cyber attacks) करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. हा अहवाल चीनची अंतरिक्ष मोहीम (Chinese space missions) आणि इतर गोष्टींवर केंद्रित आहे. अमेरिकेतील चीन एरोस्पेस स्टडीज (China Aerospace Studies Institute) इन्स्टिट्यूटच्या (सीएएसआय) अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

१४२ पानांचा आहे हा अमेरिकी अहवाल

इसरोचे म्हणणे आहे की उपग्रहांवर सायबर हल्ल्याचा धोका असतोच, पण आत्तापर्यंत याच्या प्रणालीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचलेली नाही. १४२ पानांच्या या अहवालात म्हटले आहे की २०१२ ते २०१८ यादरम्यान चीनकडून अनेक सायबर हल्ले करण्यात आले आहेत. पण या अहवालात केवळ एकाच सायबर हल्ल्याबाबत तपशीलवार सांगण्यात आले आहे. अहवालात २०१२मध्ये जेट प्रोपल्सन लॅबोरेटरीवर चिनी नेटवर्कच्या कंप्यूटरचा हल्ला झाल्याचे उल्लेख आहेत. अहवालानुसार या हल्ल्याने ‘जेपीएल नेटवर्क’चा ‘संपूर्ण ताबा’ घेतला होता. या हल्ल्यांबाबत सांगताना अनेक स्रोतांचा हवाला देण्यात आला आहे.

अहवालात दावा आहे की चीनकडे आहे अधिक चांगले काऊंटर स्पेस तंत्रज्ञान

भारताने आपली अंतराळ मोहीम आणि उपग्रह सुरक्षित ठेवण्यासाठी २७ मार्च २०१९ रोजी अँटी-सॅटलाईटचे (ए-सॅट) परीक्षण केले. या परीक्षणानंतर भारताकडे शत्रूचे उपग्रह निकामी करण्याची कायनेटिक किल ही प्रणाली आली. सीएएसआयच्या अहवालात पुढे म्हटले आहे की चीनकडे बरेच काऊंटर-स्पेस तंत्रज्ञान आहे जे शत्रूच्या अंतरिक्ष प्रणालीला जमिनीपासून ते जियोसिंक्रोनस ऑर्बिटपर्यंत लक्ष्य करू शकते.

सीमेवर आहे भारत आणि चीनदरम्यान तणाव

भारतीय उपग्रहांना लक्ष्य केले गेले असल्याचा हा अमेरिकी अहवाल अशावेळी आला आहे जेव्हा सीमेवर भारत आणि चीनदरम्यान लष्करी तणाव कायम आहेत. पूर्व लदाख आणि वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) अशा चकमकी टाळण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. पण जमिनीवर मात्र काहीच सुधारणा झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांत भारत आणि चीनच्या सैन्याच्या कमांडर्सदरम्यान सहाव्यांदा चर्चा झाली ज्यात तणाव कमी करण्याच्या दृष्टीने काही बाबतीत सहमती तयार झाली आहे.     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी