Karachi Blast: पाकिस्तानमुळे चीन मोठ्या अडचणीत! आता या गोष्टीची भीती, काय होणार मोठ नुकसान? 

लोकल ते ग्लोबल
Updated May 09, 2022 | 10:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

China Confidence In Pakistan Shaken | पाकिस्तानमधील कराची येथे गेल्या २६ मार्च रोजी एका वॅनमध्ये झालेल्या धमाक्यामुळे चीनचा पाकिस्तानवरील विश्वास उडाला आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या चिनी नागरिकांची सुरक्षा करण्यामध्ये पाकिस्तान अपयशी ठरत आहे.

China is now in big trouble because of Pakistan 
पाकिस्तानमुळे चीन मोठ्या अडचणीत! आता या गोष्टीची भीती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानमधील कराची येथे २६ मार्चला एक ब्लास्ट झाला होता.
  • पाकिस्तानमध्ये असलेल्या चिनी नागरिकांची सुरक्षा करण्यामध्ये पाकिस्तान अपयशी ठरत आहे.
  • कराची स्फोटात तीन चिनी नागरिक आणि एका पाकिस्तानी ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे.

China Confidence In Pakistan Shaken | नवी दिल्ली : पाकिस्तानमधील (Pakistan) कराची येथे (Karachi) गेल्या २६ मार्च रोजी एका वॅनमध्ये झालेल्या धमाक्यामुळे चीनचा (China) पाकिस्तानवरील विश्वास उडाला आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या चिनी नागरिकांची सुरक्षा करण्यामध्ये पाकिस्तान अपयशी ठरत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये (Balochistan) चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र तेथील स्थानिक लोक चीनच्या धोरणांना विरोध करत आहेत. कराची येथे झालेल्या स्फोटात चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. (China is now in big trouble because of Pakistan). 

अधिक वाचा : मुंबईतल्या 'या' रेल्वे स्थानकांवर दर महागला, जाणून घ्या का?

चीनला सतावतेय ही भीती

दरम्यान, कराची स्फोटात तीन चिनी नागरिक आणि एका पाकिस्तानी ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. स्फोटात ठार झालेले चिनी नागरिक हे पाकिस्तानातील शिक्षक होते. आता चीनला पाकिस्तानात राहणाऱ्या आपल्या नागरिकांची आणि केलेल्या गुंतवणुकीची चिंता आहे. विशेष म्हणजे बलुचिस्तानचे लोक मोठ्या कालावधीपासून चीनला विरोध करत आहेत. चीन आपली संसाधने हडप करत असल्याचा आरोप ते करत आहेत. 

चीनचा पाकिस्तानवरील विश्वास उडाला

सिनेटच्या संरक्षण समितीचे अध्यक्ष मुशाहिद हुसेन (Mushahid Hussain) यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या सुरक्षेबाबत चीनच्या विश्वासाला मोठा धक्का बसला आहे. गरीब पाकिस्तानमध्ये गुंतवलेला आपला पैसा बुडू नये याची चीनलाही काळजी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानी सुरक्षा दलांचे दावे ठरले खोटे

त्यांनी म्हटले की, चीन सध्या गंभीर चिंतेत आहे. हल्ल्यांचा प्रकार लक्षात घेता चीनला पाकिस्तानने दिलेल्या आश्वासनांची जाणीव झाली आहे की ते फक्त शब्द आहेत. त्यांची आश्वासने प्रत्यक्षात दिसत नाहीत. मुशाहिद हुसेन यांनी पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केला. एजन्सी झोपल्या आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला. 

लक्षणीय बाब म्हणजे एका वर्षात पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत असलेल्या चिनी नागरिकांवर तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत. कराची बॉम्बस्फोटानंतर चिनी नागरिकांनी पाकिस्तान सोडून आपल्या देशात जाण्यास सुरूवात केल्याचे अनेक वृत्तांत सांगितले जात आहे. मात्र चिनी सूत्रांनी याला नकार दर्शवला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी