चीन : शांघायमध्ये लॉकडाऊन, झिरो कोविड पॉलिसीमुळे नागरिक त्रस्त

China: Lockdown in Shanghai, Citizens suffer due to Zero Covid policy  : चीनची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या शांघाय शहरात कोरोना संकटामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. शांघायमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. सॅनेटायझेशन करण्याच्या नावाखाली लाखो नागरिकांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढले आहे.

China: Lockdown in Shanghai, Citizens suffer due to Zero Covid policy
चीन : शांघायमध्ये लॉकडाऊन, झिरो कोविड पॉलिसीमुळे नागरिक त्रस्त  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चीन : शांघायमध्ये लॉकडाऊन, झिरो कोविड पॉलिसीमुळे नागरिक त्रस्त
  • चीनने कठोर लॉकडाऊन राबविण्यास सुरुवात केली
  • सॅनेटायझेशन करण्याच्या नावाखाली लाखो नागरिकांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढले

China: Lockdown in Shanghai, Citizens suffer due to Zero Covid policy  : शांघाय : चीनची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या शांघाय शहरात कोरोना संकटामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. शांघायमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे चीनने कठोर लॉकडाऊन राबविण्यास सुरुवात केली आहे. 

ज्या घरात एखादा कोरोना रुग्ण आढळतो त्या घराला शांघाय प्रशासन क्वारंटाइन करत आहे. घराचा दरवाजा सील केला जातो. घराबाहेर पडण्यालाच मनाई केली जात आहे. घराच्या दाराबाहेर एक यंत्र लावले जाते. यामुळे कोणी सील तोडून घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर जवळच्या पोलीस ठाण्याला आणि कोरोना नियंत्रण कक्षाला माहिती मिळते. संबंधित विभागांचे पथक घटनास्थळी पोहोचते आणि घराबाहेर पडणाऱ्यास पकडून जबरदस्तीने क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवले जाते.

शांघायच्या क्वारंटाइन सेंटरमधील सोयीसुविधा, जेवण, पाणी याविषयी अनेकांच्या तक्रारी आहेत. पण या तक्रारींकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. 

धक्कादायक म्हणजे शांघाय प्रशासनाने सॅनेटायझेशन करण्याच्या नावाखाली लाखो नागरिकांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढले आहे. नागरिकांना घरातले सामान पॅक करा आणि दरवाजे उघडे ठेवून तिथून बाहेर पडा असा आदेश देण्यात आला आहे. अगदी कपाटांचे दरवाजेही उघडे ठेवण्यास बजावले जात आहे. घरात नियमित औषध पवारणी केली जात आहे. सलग काही दिवस ठराविक तासांच्या अंतराने घरांमध्ये फवारणी होत आहे.

सॅनेटायझेशनमुळे घराबाहेर असलेल्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. सामानासोबत घराबाहेर किती काळ राहायचे हे प्रशासन सांगत नसल्यामुळे लोकांना नियोजन करणे कठीण झाले आहे. काहींनी तर अन्नपाण्यासाठी चोऱ्या करणे किंवा छोटी चोरी करुन स्वतःला पकडून घ्यायचे आणि जेलमध्ये राहून फुकटात खाण्यापिण्याची सोय करुन घ्यायची असा उद्योग चालवले आहेत. 

मागील पाच आठवड्यांपासून शांघायमध्ये झिरो कोविड पॉलिसी अंतर्गत कठोर लॉकडाऊन आणि त्याहीपेक्षा कठोर सॅनिटायझेशन सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी