China Richest Country | अमेरिका नाही चीन बनला आहे जगातील सर्वात श्रीमंत देश, २० वर्षात कमावली संपत्ती, पाहा कसे

China becomes Richest Country | जगातील एकूण संपत्तीच्या एकतृतियांश संपत्ती चीनकडे (China's wealth)आहे. जगातील सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या चीन आणि दुसऱ्या क्रमांकावरील अमेरिकेतील संपत्तीचा खूप मोठा फक्त काही मोजक्याच श्रीमंत लोकांकडे आहे. या अहवालानुसार या दोन श्रीमंत देशांमधील फक्त १० टक्के लोकसंख्येकडेच सर्वाधिक संपत्ती आहे. या दोन्ही देशांमध्ये श्रीमंतांची संख्या जबरदस्त वेगाने वाढते आहे. त्यामुळेच श्रीमंत देश आणि गरीब देश यांच्यातील दरी वाढतच चालली आहे.

China becomes richest country in World
चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश 
थोडं पण कामाचं
  • चीनने (China)अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत देश असण्याचा किताब पटकावला
  • २० वर्षांच्या कालावधीत जगाच्या आणि चीनच्या संपत्तीत मोठी वाढ
  • चीनच्या संपत्तीत मोठी वाढ होत ती ५१४ ट्रिलियन डॉलरवर पोचली

China becomes Richest Country | नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत देश (World's richest country) म्हणून ख्याती असलेला अमेरिका (America) आता पिछाडला आहे. चीनने (China)अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत देश असण्याचा किताब पटकावला आहे. मागील दोन दशकांमध्ये चीनने अभूतपूर्व विकास साधत चारी दिशांना घोडदौड केली आहे. या २० वर्षांच्या कालावधीत जगाच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे, त्याचबरोबर चीनच्या संपत्तीत देखील जबरदस्त वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जगातील एकूण संपत्तीच्या (Total wealth in World) एकतृतियांश संपत्ती चीनकडे (China's wealth)आहे. मॅकेन्झी या मॅनेजमेंट कन्सलटन्ट कंपनीने केलेल्या अभ्यासातून आणि त्यांच्या एका अहवालानुसार चीन आता जगातील सर्वात श्रीमंत देश बनला आहे. (China overtakes America & becomes the richest country in the world, know how)

या अहवालात याचाही उल्लेख करण्यात आला आहे की जगातील सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या चीन आणि दुसऱ्या क्रमांकावरील अमेरिकेतील संपत्तीचा खूप मोठा फक्त काही मोजक्याच श्रीमंत लोकांकडे आहे. या अहवालानुसार या दोन श्रीमंत देशांमधील फक्त १० टक्के लोकसंख्येकडेच सर्वाधिक संपत्ती आहे. या दोन्ही देशांमध्ये श्रीमंतांची संख्या जबरदस्त वेगाने वाढते आहे. त्यामुळेच श्रीमंत देश आणि गरीब देश यांच्यातील दरी वाढतच चालली आहे.

चीनच्या संपत्तीत वेगाने आणि मोठी वाढ

या अहवालानुसार २००० मध्ये जगातील एकूण संपत्ती १५६ ट्रिलियन डॉलर होती. तर त्यात मोठी वाढ होत २०२० मध्ये ती ५१४ ट्रिलियन डॉलरवर पोचली आहे. मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्युटनुसार जगातील काही देश वेगाने श्रीमंत झाले आहेत. जगाच्या एकूण संपत्तीच्या ६८ टक्के हिस्सा हा अचल संपत्ती रुपात आहे. तर बाकीची संपत्ती पायाभूत सुविधा, मशीनरी आणि उपकरणे यासारख्या वस्तूंमध्ये आहे. चीनसंदर्भात धक्कादायक आकडेवारी यातून समोर आली आहे. २००० मध्ये चीनची एकूण संपत्ती ७ ट्रिलियन डॉलर एवढी होती. त्यात जबरदस्त वेगाने वाढ होत ती २०२० मध्ये तब्बल १२० ट्रिलियन डॉलरवर पोचली आहे.

जगाची एक तृतियांश संपत्ती चीनकडे

चीन २०००च्या आधीच जागतिक व्यापार संघटनेत सहभागी झाला होता. चीनच्या या वाढलेल्या संपत्तीवरून चीनच्या अर्थव्यवस्थेने किती जबरदस्त वेगाने मुसंडी मारली आहे याचा अंदाज करता येऊ शकतो. या २० वर्षात जगाने जेवढी संपत्ती निर्माण केली त्याच्या जवळपास एक तृतियांश हिस्सा एकट्या चीनकडेच आहे. तर मागील २० वर्षात अमेरिकेची संपत्ती दुप्पट झाली आहे. २००० मध्ये अमेरिकेची एकूण संपत्ती ९० ट्रिलियन डॉलर इतकी होती. अमेरिकेतील मालमत्तांच्या किंमतीमध्ये जास्त वाढ न झाल्याने अमेरिकेची संपत्ती चीनच्या तुलनेत कमी वेगाने वाढली आणि अमेरिकेला आपले नंबर वन स्थान गमवावे लागले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी