पुढील ८ वर्षात लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला टाकणार मागे

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 18, 2019 | 14:10 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पुढील ८ वर्षात भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत शेजारील राष्ट्र चीनला मागे टाकणार आहे. २०२७ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल. संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्टस २०१९

Population
लोकसंख्या  |  फोटो सौजन्य: Instagram

नवी दिल्ली: आगामी ८ वर्षात भारत चीनला मागे टाकणार आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे लोकसंख्येच्या बाबतीत २०२७पर्यंत भारत चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्टस २०१९च्या रिपोर्टनुसार २०१९ ते २०१५० दरम्यान २७.३० कोटी लोकसंख्या वाढेल. सध्या भारताची लोकसंख्या १३७ कोटी रूपये आहे तर चीनची लोकसंख्या १४३ कोटी आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी चीनमध्ये १९ टक्के लोकसंख्या तर भारतात १८ टक्के लोकसंख्या राहते. ३२.९० कोटी लोकसंख्येसह अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे तर २७.१० कोटी लोकसंख्येसह इंडोनेशिया चौथ्या स्थानावर आहे. २०५० पर्यंत जगातील लोकसंख्येत तब्बल २० कोटींनी वाढ होईल आणि एकूण लोकसंख्या वाढून ९७० कोटी होईल. 

संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्टस रिपोर्टनुसार जनसंख्येसोबतच लोकांचे वयही वाढत आहे. २०५० पर्यंत प्रत्येक ६ पैकी एक व्यक्ती ६५ वर्षापेक्षा अधिक वयाची असेल. याचा अर्थ जगात केवळ १६ टक्के लोक वृद्ध असतील. २०१९मध्ये ही संख्या ११ टक्के इतकी आहे. याचा अर्थ दर ९ पैकी एक व्यक्ती वयस्कर आहे. 

 

 

यूएनच्या रिपोर्टनुसार या शतकाच्या अखेरीपर्यंत भारताची लोकसंख्या १५० कोटी होईल. तर लोकसंख्या नियंत्रण करण्याच्या योजनांमुळे चीनची लोकंख्या ११० कोटींवर थांबेल. तर ७३.७ कोटी लोकसंख्येसह नायजेरिया तिसऱ्या, ४३.४० कोटींसह अमेरिका चौख्या आणि ४०.३० लोकसंख्येसह पाकिस्तान पाचव्या स्थानावर असेल. 

जगातील या ९ देशांमध्ये आहे सर्वाधिक लोकसंख्या, भारत अव्वल

संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोसपेक्टस २०१९च्या रिपोर्टनुसार जगातील लोकसंख्येत वाढ ही ९ देशांतील वाढीमुळे होणार आहे. भारत, नायजेरिया, पाकिस्तान, काँगो, इथिओपिया, तंजानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका. भारत २०१७ पर्यंत चीनला मागे टाकत जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पुढील ८ वर्षात लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला टाकणार मागे Description: पुढील ८ वर्षात भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत शेजारील राष्ट्र चीनला मागे टाकणार आहे. २०२७ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल. संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्टस २०१९
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles