भारत-चीन सीमावाद: ट्रम्प यांची मध्यस्थीची ऑफर चीनने फेटाळली

लोकल ते ग्लोबल
Updated May 29, 2020 | 19:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले दोन्ही शेजारील देश सीमावादाबाबतचा प्रश्न सोडवण्यास सक्षम आहेत.

zhao lijjian
भारत-चीन सीमावाद: ट्रम्प यांची मध्यस्थीची ऑफर चीनने फेटाळली 

थोडं पण कामाचं

  • भारत आणि चीन यांच्यातील तणावामध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर चीनने फेटाळली
  • चीनचे परराष्ट्र मंत्रालयने सांगितले, चीन आणि भारत यांच्यातील मध्यस्थीसाठी तिसऱ्या पक्षाची गरज नाही
  • लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरारमोर, राजकीय स्तरावर बातचीत सुरू

बीजिंग: भारत-चीन सीमा वादावर डोनाल्ड्र ट्रम्प यांची मध्यस्थी करण्याची ऑफर शुक्रवारी चीनने फेटाळून लावली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते म्हणाले, दोन्ही शेजारील देश या वादाबाबतचा मुद्दा चर्चेने सोडवण्यास सक्षम आहेत. प्रवक्ते म्हणाले, झाओ लिजियन म्हणाले, भारत आणि  चीन यांच्यात सुरू असलेल्या या वादाबाबत तिसऱ्या कोणी पक्षाने मध्यस्थी करणे योग्य नव्हे.

ग्लोबल टाईम्सचा ट्रम्पवर निशाणा

याआधी चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने लिहिले की चीन आणि भारताला सध्या सीमेवर सुरू असलेल्या वादामध्ये अमेरिकेच्या मदतीची गरज नाही. ग्लोबल टाईम्सने सांगितले, सध्या भारत आणि चीन द्विपक्षीय वार्ता सोडवण्यात सक्षम आहेत. दोन्ही देशांनी अमेरिकेपासून सतर्क राहिले पाहिजे.

काय म्हणाले होते ट्रम्प

ट्रम्प यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले होते, आम्ही भारत आणि चीन दोघांना सूचित केलेय की अमेरिका सीमा वादात मध्यस्थी करण्यास तयार, इच्छुक आणि सक्षम आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाकडून ट्रम्प यांच्या ट्वीटला कोणतेही अधिकृत उत्तर आले नाही. मात्र सरकारी वार्तापत्र ग्लोबल टाईम्समध्ये छापलेल्या एका लेखात सांगितले की दोन्ही देशांना अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या मदतीची गरज नाही.

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बातचीत करताना सांगितले की, भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे. पंतप्रधान मोदी मला आवडतात. ते जेंटलमेन आहेत. भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू आहे. दोघांचे सैन्यही खूप ताकदीचे आहेत. सध्याच्या वादामुळे भारतही खूश नाही आणि चीनही नाही.

याआधीही एकदा ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्या वादामध्ये उडी घेत सहकार्य करण्याची ऑफर दिली होती. सध्या भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावरून चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. चीन आणि भारत या दोन्ही देशांनी आपले सैन्य मोठ्या संख्येने सीमेवर आणून ठेवले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी