US China News, China Sends Spy Balloon To US Collecting Sensitive Informations, Officials Tracking It, Read news in Marathi : मीडिया रिपोर्टनुसार, चिनी फुग्यातून हेरगिरीचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार लक्षात येताच तातडीने आकाशात लढाऊ विमान पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. हा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला.
अमेरिकेतील मोंटाना प्रांतातल्या बिलिंग्स शहराच्या आकाशात एक फुगा दिसत होता. आकाशात दिसत असलेला हा फुगा चीनने हेरगिरीसाठी पाठवल्याचे अमेरिकेच्या लक्षात आले. यानंतर अमेरिकेने एक एफ-22 लढाऊ विमान आकाशात पाठवण्याबाबत तातडीची बैठक बोलावली.
बिलिंग्सच्या आकाशात दिसण्याआधी चिनी फुगा अलास्कातील अलेउतियन बेटांचा समूह आणि कॅनडाच्या आकाशात दिसला होता. फुगा हवाई हल्ला करून फोडला तर फुग्याचा ढिगारा नागरी वस्तीवर कोसळण्याचा धोका आहे. यामुळे फुगा आकाशात दिसला तरी पाडण्याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. पण आवश्यकता भासली तर फुगा फोडण्यासाठी हवाई हल्ला करण्याबाबत अमेरिकेत विचार सुरू आहे.
अमेरिकेचे सरकार घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ, असे संकेत बायडेन प्रशासनाने दिले आहेत. अमेरिकेचे संरक्षणमंत्री एल. ऑस्टिन आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी परिस्थितीचा सतत आढावा घेत आहेत.
चिनी फुगा कोणकोणत्या भागातून उडत आहे आणि या फुग्याद्वारे कोणकोणत्या माहितीचे संकलन करण्यात आले याचे ट्रॅकिंग आधुनिक यंत्रणेच्या मदतीने अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केले आहे. अद्याप चीनला कोणतीही मोठी संवेदनशील अशी माहिती मिळालेली नाही, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
हेरगिरीचा प्रयत्न करत असलेला फुगा खूप उंचावरून उडत आहे. या फुग्यामुळे व्यावसायिक विमानांना कोणताही धोका नाही. यामुळे अमेरिकेतील प्रवासी विमान वाहतूक आणि विमानाद्वारे होणारी मालवाहतूक विना अडथळा सुरक्षितरित्या सुरू आहे.
एका वर्षात 9 हजारपेक्षा जास्त विद्यार्थिनी झाल्या गरोदर
Mobile वर येणाऱ्या Ads Block करण्याच्या Tips
अमेरिकेने चिनी फुग्याचा आकार आणि त्याची सध्याची भौगोलिक स्थिती याबाबत नेमकी माहिती देण्यास नकार दिला. घबराट उडू नये म्हणून ही माहिती देत नसल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे.