चीनमध्ये उईगर मुस्लिम महिलांवर रासायनिक हल्ला

china sprayed dangerous chemicals on uighur muslim women चीनमध्ये कोरोना संकटाचे निमित्त साधून उईगर मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. या अन्यायाचे पुरावे हळू हळू उघड होत आहेत.

china sprayed dangerous chemicals on uighur muslim women
चीनमध्ये उईगर मुस्लिम महिलांवर रासायनिक हल्ला 

थोडं पण कामाचं

  • चीनमध्ये उईगर मुस्लिम महिलांवर रासायनिक हल्ला
  • एका मध्यमवयीन उईगर मुस्लिम महिलेने अन्यायाला वाचा फोडताच आणखी महिलांनीही दिली माहित
  • चीन सरकारची उईगर मुस्लिमांना पक्षपाती वागणूक

बीजिंग: चीनमध्ये (china) कोरोना संकटाचे निमित्त साधून उईगर मुस्लिमांवर (uighur muslim) मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. या अन्यायाचे पुरावे हळू हळू उघड होत आहेत. झिनजिआंगमध्ये (Xinjiang) एका मध्यमवयीन उईगर मुस्लिम महिलेवर रासायनिक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघड झाला आहे. (china sprayed dangerous chemicals on uighur muslim)

कोरोना काळात क्वारंटाइन करण्याचे निमित्त करुन उईगर मुस्लिम महिलेला एका जागेवर कोंडून ठेवण्यात आले. या ठिकाणी दररोज तिला जबरदस्तीने एक रासायनिक द्रवपदार्थ पिण्यासाठी देत होते. हा पदार्थ प्यायल्यावर महिलेला अशक्तपणा जावणत होता. आठवड्यातून एकदा या महिलेला अंगावरचे कपडे काढून उभे राहण्याचा आदेश दिला जात होता. महिलेच्या शरीरावर रासायनिक फवारणी केली जात होती. महिलेने नियमित सुरू असलेल्या दोन्ही प्रकारांबाबत नाराजी व्यक्त केली आणि चौकशी सुरू केली, मात्र तिला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तब्बल ४० दिवस महिला क्वारंटाइनमध्ये हाल सोसत जगत होती. 

शरीरावर रासायनिक प्रयोग सुरू असल्यामुळे महिलेच्या त्वचेवर दुष्परिणाम दिसू लागले. सुरकुत्या पडू लागल्या. त्वचा साल निघावं तशी निघत होती. हात काळवंडले आणि खरखरीत झाले. रसायनांचा त्रास होत असूनही महिलेवर रसायनांचा मारा सुरू होता. महिलेने चिनी अन्यायाची माहिती दिल्यानंतर आणखी उईगर मुस्लिम महिलांनीही आपल्याला अशाच स्वरुपाचे अनुभव आल्याचे सांगायला सुरुवात केली.

विरोध केला तर अटक करू आणि कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करू, अशी धमकी देऊन उईगर मुस्लिमांवर रासायनिक प्रयोग सुरू होते. काही उईगर मुस्लिमांना विशिष्ट चिनी औषधांचे सेवन करण्याची सक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे या औषधांच्या सेवनातून कॅन्सरचा धोका असल्याचे ठोस पुरावे हाती आले आहेत. हे माहीत असूनही चिनी औषधे हर्बल मेडिसिनच्या नावाखाली उईगर मुस्लिमांना दिली जात होती. विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात होती.

अॅलोपथीच्या औषधांचे प्रयोग होतात. नागरिकांच्या संमतीने त्यांच्यावर प्रयोग होतात आणि औषधांच्या चांगल्या वाईट परिणामांचे मोजमाप होत असते. मात्र चिनी औषधांबाबत असा कोणताही डेटा उपलब्ध नाही. या औषधांची चाचणी झाल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. मात्र चीन सरकार दबाव टाकून उईगर मुस्लिमांना चिनी औषधांचे सेवन करण्यासाठी सक्ती करत होते. 

चीन सरकारच्या या कृत्याचा काही चिनी डॉक्टरांनीच विरोध केला. डेटा नसताना औषधांचा मारा केला आणि रुग्णाची तब्येत बिघडली तर जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न डॉक्टरांनी विचारला. मात्र चीन सरकारने डॉक्टरांना स्पष्टीकरण देण्याऐवजी आपले उद्योग सुरू ठेवले. 

अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी चीनच्या'किंगफेई पाइडु' या औषधावर बंदी घातली आहे. हे औषध कॅन्सरला कारणीभूत ठरते असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र चीन सरकारने उईगर मुस्लिमांपैकी अनेकांना कोरोना झाल्यावर सक्तीने 'किंगफेई पाइडु' या औषधाचे सेवन करायला लावले. या उद्योगानंतरही झिनजिआंगमधील कोरोना नियंत्रणात आला नाही. चीनच्या झिनजिआंग प्रांतात १५ जुलैपर्यंत ८२६ कोरोनाबाधीत होते. नंतर चीन सरकारने झिनजिआंगमध्ये सलग ४५ दिवस लॉकडाऊन जाहीर केले. नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. या लॉकडाऊनमुळे अद्याप झिनजिआंग प्रांतात कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेले नाही. 

याआधी चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरात कठोर लॉकडाऊन सुरू होते. वुहानमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त तर संपूर्ण हुबेई प्रांतात ६८ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर हुबेई प्रांतात, प्रामुख्याने वुहान शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे झिनजिआंगपेक्षा जास्त कोरोना रुग्ण हुबेई प्रांतात तसेच तिथल्या वुहानमध्ये आढळले. मात्र वुहानच्या नागरिकांवर 'किंगफेई पाइडु' या चिनी औषधाच्या सेवनाची सक्ती करण्यात आली नाही. त्यांना मास्क घालून आणि सोशल डिस्टंस पाळून घराबाहेर मर्यादीत अंतरापर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी