Bonus for Third Child : बीजींग : गेल्या अनेक वर्षांपासून चीनने सिंगल चाईल्ड पॉलिसी राबवली होती. त्याचे दुष्परिणाम म्हणजे चीनमध्ये वृद्ध नागरिकांची लोकसंख्या अधिक झाली असून तरुण नागरिकांची लोकसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे घाबरलेल्या चीनने आता जास्त मुलांना जन्माला घालणार्या दाम्पत्यांना प्रोत्साहन दिले आहे. याच पार्श्वभूमीवर चीनमधल्या एका कंपनीने आपल्या कर्मचार्यांनी एक खास योजना आणली आहे. तिसरे मुल जन्माला घालणार्या कर्मचार्याला एक वर्षाची सुट्टी आणि साडे अकरा लाख रुपयांचा बोनस कंपनीने जाहीर केला आहे. (china tech company offer bonus and one year holiday for third child )
Beijing Dabeinong Technology Group announced a maternity promotion plan which adds up to one year off to the national standard maternity leave for staffers having a third child and a CNY90,000 (USD14,120) bonus, the head of the feed products provider told Yicai Global yesterday. pic.twitter.com/PDgNmf40xR — Yicai Global 第一财经 (@yicaichina) January 11, 2022
चीनमधील Yicai Global दिलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये बेबी बोन्स, एक्सटेंडेट पेड लीव्ह्स, कर सवलत, मुलांचे पालन पोषण करण्यासाठी अनुदान अशा योजनांना प्रोत्साहन दिले जात आहे. तिसरे मुल जन्माला घालण्यासाठी सरकार दाम्पत्यांना अशा प्रकारे योजना राबवत आहे. सरकारसह काही कंपन्यांनींही असे बोनस जाहीर केले आहे.
Beijing Dabeinong Technology Group या टेक कंपनीने आपल्या कर्मचार्यांना तिसरे मूल जन्माला घातल्यास चांगलीच ऑफर दिली आहे. तिसरे मूल जन्माला घातल्यास कर्मचार्यांना ९० हजार युआन (भारतीय रुपये ११ लाख ५० हजार) रोख रक्कम मिळणार आहे. इतकेच नाही तर कंपनीने कर्मचार्यांना वर्षभराची सुटीही जाहीर केली आहे.
इतकेच नाही तर कंपनीने पहिल्या आणि दुसर्या अपत्यासाठीही बोनस जाहीर केला आहे. कंपनीने पहिल्या अपत्यासाठी कर्मचार्यांना ३० हजार युआन म्हणजेच ३.५४ लाख रुपये तर दुसर्या अपत्यासाठी ६० हजार युआस म्हणजेच ७ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम देण्याचे जाहीर केले आहे.