चीन हवामान बदल करुन भारताला त्रास देण्याच्या प्रयत्नात

हवामानात बदल करुन भारत आणि शेजारी देशांना छळण्यासाठी चीनने नवी योजना तयार केल्याचे वृत्त आहे. चीन विशिष्ट रासायनिक रॉकेटचा आकाशात स्फोट करुन हवामानात बदल करण्याच्या प्रयत्नात आहे.

China to Drastically Expand Weather Modification Program
चीन हवामान बदल करुन भारताला त्रास देण्याच्या प्रयत्नात 

थोडं पण कामाचं

  • चीन हवामान बदल करुन भारताला त्रास देण्याच्या प्रयत्नात
  • कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे या प्रकल्पात चीनची अब्जावधींची गुंतवणूक
  • कृत्रिमरित्या अतीवृष्टी अथवा अतीहिमवृष्टी करुन भारतासह शेजारी देशांमध्ये मोठे पूर आणण्याचा चीनचा प्रयत्न

बीजिंग: हवामानात बदल करुन भारत आणि शेजारी देशांना छळण्यासाठी चीनने नवी योजना तयार केल्याचे वृत्त आहे. चीन विशिष्ट रासायनिक रॉकेटचा आकाशात स्फोट करुन हवामानात बदल करण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रकल्पासाठी चीन सरकारने अब्जावधींच्या निधीची तरतूद केली आहे. या पैशांतून टप्प्याटप्प्याने २०२५ पर्यंत चीन ५५ लाख चौरस किलोमीटर परिसरातील वातावरणात बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. कृत्रिमरित्या अतीवृष्टी अथवा अतीहिमवृष्टी करुन भारतासह शेजारी देशांमध्ये मोठे पूर आणण्यासाठी चीन तयारी करत आहे. (China to Drastically Expand Weather Modification Program)

चीनची मोहीम यशस्वी झाल्यास संपूर्ण भारतीय उपखंड मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. हे संकट टाळण्यासाठी चीनचे प्रचंड आर्थिक नुकसान करणे अथवा चीनपुढे नवी आव्हाने उभी करुन हवामान बदल प्रकल्पाच्या कामात अडथळे आणणे हेच उपाय जिनपिंग सरकारच्या विरोधकांच्या हाती आहेत.

बाष्पयुक्त ढगांवर सिल्व्हर आयोडाइड फवारल्यास त्या ढगांतून पाऊस सुरू होतो. याच पद्धतीने ज्या भागांमध्ये हिमवृष्टी होते अशा अतीथंड भागांमध्ये बाष्पयुक्त ढगांवर सिल्व्हर आयोडाइड फवारल्यास हिमवृष्टी सुरू होते. हे तंत्र अस्तित्वात आहे. मात्र या तंत्राचा अतिरेकी वापर करुन कृत्रिमरित्या अतीवृष्टी अथवा अतीहिमवृष्टी करुन भारतासह शेजारी देशांमध्ये मोठे पूर आणण्यासाठी चीन तयारी करत आहे.

कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे या प्रकल्पात प्रचंड अनिश्चितता आहे. पण फायदा झाला तर जिथे कोरडा दुष्काळ आहे अथवा पावसाची गरज आहे अशा कृषी क्षेत्राला फायदा होऊ शकतो. याच कारणामुळे भारत, चीन, अमेरिकेसह अनेक देशांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. मात्र कोणत्याही देशाला सलग काही वर्षे या प्रयोगामुळे प्रचंड फायदा झाल्याचे उदाहरण उपलब्ध नाही. पण शेजारी देशांना छळण्यासाठी उत्सुक असलेल्या चीनने अब्जावधींची गुंतवणूक करुन हा प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू केली आहे. 

चीनने २०१२ ते २०१७ दरम्यान कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे या प्रकल्पात १.३४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. शिनजियांग प्रांतातील शेतीचे उत्पन्न वाढवले. प्रकल्प यशस्वी होत असल्याचे बघून चीनने अनिश्चितता असूनही कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे या प्रकल्पात अब्जावधींची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे.

भारत आणि चीन यांच्यात एप्रिल २०२० पासून तणाव आहे. हा तणाव कमी होण्याची शक्यता अद्याप दृष्टीपथात आलेली नाही. भारत चीनला जबर टक्कर देण्याची तयारी करत आहे. भारताला जागतिक पातळीवर बड्या देशांकडून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. याच कारणामुळे लष्करीदृष्ट्या नाही तर हवामानात बदल करुन भारताला आणि शेजारी देशांना नामोहरम करण्याची तयारी चीन करत आहे. 

चीनच्या प्रकल्पाला यश लाभले तर पृथ्वीवरील वातावरणावर मोठा प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका आहे. कारण याआधी कोणत्याही देशाने ५५ लाख चौरस किलोमीटर परिसरातील वातावरणात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. एवढ्या मोठ्या भूभागात मोठ्या प्रमाणावर कृत्रिमरित्या पाऊस पाडला अथवा हिमवृष्टी केली तर संपूर्ण पृथ्वीचे निसर्गचक्र बिघडण्याचा धोका आहे, अशी भीती हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

चीनचा प्रयोग किती यशस्वी होईल याविषयी खात्रीने सांगणे कठीण आहे. मात्र हा प्रयोग जास्त यशस्वी झाला तर पृथ्वीचे निसर्गचक्र बिघडेल, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. निसर्गाच्या व्यवस्थेत अवास्तव हस्तक्षेप संपूर्ण पृथ्वीसाठी धोक्याचा ठरेल, अशी भीती हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शेजारी देशांसोबत समन्वय न राखता एकतर्फी हवामान बदल कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवल्यास या मुद्यावरुन चीन आणि शेजारी देश यांच्यातील वाद वाढण्याची आणि चिघळण्याचीही शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी