Nancy Pelosi Taiwan visit : चीनच्या धमक्यांना भीक न घालता अमेरिकेच्या Nancy Pelosi तैवान दौऱ्यावर, तैवानमध्ये युद्धाचे ढग

US House Speaker Nancy Pelosi Taiwan visit: तैवानच्या मुद्द्यावरुन चीन आणि अमेरिका आता आमने-सामने आले आहेत. तैवानच्या मुद्दयावरुन वातावरण तापले असताना US House Speaker नॅन्सी पेलोसी तैवानच्या दौऱ्यासाठी पोहोचल्या आहेत. 

China vs America over Taiwan US house speaker Nancy pelosi lands in taipei Taiwan
Nancy Pelosi Taiwan visit : चीनच्या धमक्यांना भीक न घालता अमेरिकेच्या Nancy pelosi तैवानमध्ये दाखल   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • तैवानवरुन चीन-अमेरिका आमने-सामने
  • तैवानच्या मुद्द्यावरुन चीन-अमेरिकेत तणाव, युक्रेननंतर तैवानने जगाची चिंता वाढवली 
  • नॅन्सी पेलोसी पूर्व आशियाच्या दौऱ्यावर

Nancy Pelosi lands in Taiwan amid threat from China: तैवानच्या मुद्द्यावरुन अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. US House speaker नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) या तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. नॅन्सी पेलोसी या पूर्व आशियाच्या दौऱ्यावर असून त्या तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. कारण, पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला चीनचा विरोध आहे. (China vs America over Taiwan US house speaker Nancy Pelosi lands in Taipei Taiwan)

यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल असा इशाराच चीनने अमेरिकेला दिला होता. मात्र, चीनच्या या धमकीला भीक न घालता नॅन्सी पेलोसी या तैवानच्या दौऱ्यावर पोहोचल्या आहेत. 

नॅन्सी पेलोसींना सुरक्षा कवच

यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांना चीनने दिलेली धमकी निष्फळ ठरली आहे. नॅन्सी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास तैवानमध्ये दाखल झाल्या. नॅन्सी पेलोसी यांच्यासोबत सुरक्षेचं मोठं कवच असल्याचं पहायला मिळत आहे. पेलोसी यांच्या सुरक्षेसाठी आठ US F15 फायटर जेट आणि 5 टँकर विमान्स तैनात करण्यात आले आहेत.

अधिक वाचा : Al Qaeda leader: जवाहिरीनंतर आता 'या' दहशतवाद्याच्या शोधात अमेरिका, माहिती देणाऱ्याला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस

तैवानवरुन चीन-अमेरिका आमने-सामने

अमेरिकेने मंगळवारी चार युद्धनौका आणि एक विमानवाहू जहाज तैवानच्या पूर्वेला तैनात केले आहे. ज्याला अमेरिकन नौसेनेने रुटीन तैनात असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी अमेरिकेने आपले दोन विमानवाहू युद्धनौका, डझनभर युद्धनौका आणि तीन पाणबुड्या तैवानच्या सीमेच्या अगदी जवळ पाठवल्या होत्या. त्याचवेळी चीनने तैवानच्या दिशेने घातक युद्धनौका आणि लढाऊ विमानेही मोठ्या प्रमाणात तैनात केली आहेत.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानूसार, आता जो बायडेन प्रशासन चीनला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला विरोध करणाऱ्या चीनने त्यांचा दौरा रोखण्याचं धाडस केलेलं नाही.

काही तज्ज्ञांच्या मते, चीनने फक्त धमकी दिली आहे. तो असं काहीही करणार नाही ज्यामुळे अमेरिकेशी थेट सामना करावा लागेल. याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिका आता या क्षेत्रात एक बलाढ्य बनली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी