China Vs US चीनच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे वाढली अमेरिकेची चिंता

China's hypersonic missile test raises US concerns चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. या चाचणीमुळे अमेरिकेच्या संरक्षणाशी संबंधित चिंतेत भर पडली.

China's hypersonic missile test raises US concerns
चीनच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे वाढली अमेरिकेची चिंता 
थोडं पण कामाचं
  • चीनच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे वाढली अमेरिकेची चिंता
  • चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली
  • सध्या अस्तित्वात असलेली रडार हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेध घेऊ शकत नाही

China's hypersonic missile test raises US concerns​ । बीजिंग: चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. या चाचणीमुळे अमेरिकेच्या संरक्षणाशी संबंधित चिंतेत भर पडली. या प्रकारात पृथ्वी प्रदक्षिणा करुन लाँचर विशिष्ट उंचीवर एका ठिकाणी थांबले. यानंतर लाँचरमधून निघालेले क्षेपणास्त्र निश्चित केलेल्या लक्ष्यावर आदळणे अपेक्षित होते. ही चाचणी अयशस्वी झाली. मात्र या प्रयोगासाठी आवश्यक तंत्रज्ञानाच्या निर्मितीपर्यंतची प्रगती चीनने केल्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.

आतापर्यंत शत्रू भौगोलिकदृष्ट्या कोणत्या सीमेजवळ आहे त्या सीमेनजीक आधुनिक रडार सज्ज ठेवून संरक्षणाची व्यवस्था केली जात होती. रडारच्या मदतीला उपग्रह असायचे. तसेच ड्रोन आणि निवडक ठिकाणी बसवलेले कॅमेरे यांच्या मदतीने शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होते. पण चीन विकसित करत असलेले तंत्रज्ञान प्रत्यक्षात आले तर शत्रू देश कोणत्याही वेळी कोणत्याही दिशेने हल्ला करू शकेल. संरक्षणासाठी संपूर्ण देशात आणखी आधुनिक आणि सक्षम रडारचे जाळे विणावे लागेल. ही प्रक्रिया महाखर्चिक आणि वेळखाऊ आहे. यामुळेच चीनची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील प्रगती पाहून अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे.

चीनने घेतलेल्या चाचणीमुळे आता नव्या शीतयुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता वाढली आहे. पहिले शीतयुद्ध अमेरिका आणि रशिया यांच्यात झाले. आता दुसरे शीतयुद्ध अमेरिका आणि चीन यांच्यात होण्याची शक्यता आहे. शीतयुद्ध सुरू झाले तर प्रतिस्पर्धी देशांमध्ये संहारक शस्त्रांच्या निर्मितीची आणि या शस्त्रांच्या साठेबाजीची स्पर्धा सुरू होईल. जगातील अनेक देश अमेरिकेचे मित्र आणि चीनचे मित्र अशा दोन गटात विभागले जातील. जगातील अनेक देशांमध्ये वाद उफाळून येण्याची आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढेल. यामुळेच चीनने केलेल्या चाचणीमुळे अमेरिकेत चिंतेचे वातावरण आहे.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ध्वनीपेक्षा पाच पट जास्त वेगाने म्हणजेच ताशी ६२०० किमी वेगाने झेपावते. क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षाही हे क्षेपणास्त्र त्याच्या वेगामुळे घातक ठरते. जगात सध्या अस्तित्वात असलेली रडार हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेध घेऊ शकत नाही. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेध घेण्यासाठी नव्याने विशेष यंत्रणा विकसित करावी लागते. चीनने चाचणीच्या निमित्ताने अशी एक यंत्रणा विकसित केली आहे. इतर देशांची या क्षेत्रातील तांत्रिक क्षमता किती आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी