China's worst drought in six decades, Asia's largest riverbed dry : चीनमध्ये सहा दशकांतील सर्वात मोठा कोरडा दुष्काळ पडला आहे. आशियातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या यांगत्से नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडेठाक पडल्याचे चित्र आहे. पाण्याच्या अभावामुळे जलविद्युत प्रकल्पांचे काम थंडावले आहे. यांगत्से नदीचे पाणी वापरून चालणारे अनेक औद्योगिक प्रकल्प ठप्प आहेत. पाण्याअभावी चीनमधील शेतीच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पिकं पाणी नसल्यामुळे करपली आहेत. चीनच्या अनेक भागांमध्ये पारा चाळीस अंश से. किंवा त्यापेक्षा वर आहे. अनेक दिवसांपासून कडक उन्हाळा असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. चीनच्या जंगलांमध्ये उन्हाच्या कडाक्यामुळे वणवे पेटल्याने शेकडो एकरांची वनसंपदा खाक झाली आहे. परिस्थिती दिवसागणिक बिकट होत आहे.
चीनमधील चोंगकिंग, सिंचुआन प्रांताचा सीमेजवळचा भाग, झेंजियांग प्रांताचा पूर्वेकडील भाग आणि शांनक्सी प्रांत येथे १ ऑगस्ट २०२२ पासून पाऱ्याने ४० अंश से. तापमानाचा टप्पा ओलांडला आहे. अद्याप तापमान कमी झालेले नाही. जंगलात वेगाने पसरत असलेले आणि वनसंपत्ती नष्ट करत असलेले वणवे, शेतात करपलेली पिकं, पाण्याअभावी कोरडे पडलेले जलस्रोत, कोरडे पडलेले यांगत्से नदीचे पात्र आणि सततचे असह्य उन यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
IKEA मध्ये गोंधळ, आरडाओरडा आणि पळापळ, नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
चीनमधील यूनान, सिचुआन, हुबेई, हुनान, जियांग्शी, अनहुई, जियांग्सु या प्रांतात कोरडा दुष्काळ पडला आहे. चीनमध्ये यंदा सामान्य स्थितीपेक्षा ४० टक्के कमी पाऊस पडला आहे. कोरोना आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटामुळे मंदावलेले औद्योगिक उत्पादन, थंडावलेली अर्थचक्राची गती या प्रतिकूल परिस्थितीमुळे चीनमध्ये जगावे कसे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
VLC Media Player वर बंदी, वेबसाईट आणि डाऊनलोड लिंक केली ब्लॉक
चीनचे शास्त्रज्ञ कृत्रिम पाऊस पाडून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अद्याप त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. वातावरणात पुरेसे पाऊस पाडण्यायोग्य ढगच नसल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडणे हे मोठे आव्हान झाले आहे.
मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 12000 हून कमी किमतीची चीनी मोबाइल होणार बंद?
चीनने २०२० मध्ये कृत्रिम पावसाचा एक मोठा प्रयोग केला होता. यांगत्से नदीवर आलेल्या ढगांना विशिष्ट पद्धतीने ढकलून यलो रिव्हर (पिवळी नदी) येथे कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. हा प्रयोग एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आला की चीनमधील निसर्गचक्र बिघडले. हा परिणाम किती काळ राहणार आणि पुढे काय होणार हे सांगणे कठीण आहे. पण आधीच कोरोना संकटामुळे पिचून निघालेल्या चीनमध्ये आता दुष्काळाचे संकट आले आहे.