India-China Row: चीनची (China) लढाऊ विमाने सीमेवर सातत्याने असे उल्लंघन करत आहेत. चीनने LAAC वर पुन्हा चिथावणीखोर कृती केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे विमान एलएसीवरील नो फ्लाय झोनमध्ये घुसले होते. चीनची लढाऊ विमाने 10 किमी आत घुसली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमध्ये (Ladakh) चिनी लढाऊ विमाने दिसली आहेत. चीनच्या कारवायामुळे भारतीय हवाई दलही (Indian Air Force) सतर्क आहे.
गेल्या एक महिन्यापासून चीनकडून सातत्याने हे कृत्य केले जात आहे. यापूर्वी भारतीय हवाई दल प्रमुखांनीही चीनकडून प्रक्षोभक कारवाई केली जात असल्याचे वक्तव्य केले होते. भारत आणि चीन यांच्यातील 16 व्या फेरीच्या लष्करी स्तरावरील चर्चेच्या दरम्यान चीन सातत्याने अशा कारवाया करत आहे. या संवादादरम्यान भारताने चीनकडून अशा प्रकारच्या उल्लंघनाचा मुद्दाही उपस्थित केला होता.
Read Also : Sex Racket: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
चीनकडून अशी कोणतीही कारवाई झाल्यास त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारतीय हवाई दलाकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने पूर्व लडाखमध्ये पूर्णपणे सक्रिय आहेत. त्याचवेळी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले की ते चीनकडून केल्या जात असलेल्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत.
Read Also : सांगलीत हॉस्पिटलमधून एका दिवसाच्या बाळाचे अपहरण
भारत आणि चीन यांच्यात एक अघोषित करार आहे की दोन्ही देशांची लढाऊ विमाने LAAC च्या 10 किमीच्या आत येऊ शकत नाहीत आणि हेलिकॉप्टर 5 किमीच्या परिघात येऊ शकत नाहीत. पण चीन आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. यापूर्वी जूनमध्येही पूर्व लडाखजवळ एक चिनी लढाऊ विमान दिसले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलही सतर्क आहे.