पत्नीशी भांडून घर सोडले, १४ वर्षांपासून विमानतळावर मुक्काम

Chinese Man Has Been Living At The Airport For 14 Years : चिनी व्यक्ती चौदा वर्षांपासून राजधानी बीजिंग येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम करत आहे.

Chinese Man Has Been Living At The Airport For 14 Years
पत्नीशी भांडून घर सोडले, १४ वर्षांपासून विमानतळावर मुक्काम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पत्नीशी भांडून घर सोडले, १४ वर्षांपासून विमानतळावर मुक्काम
  • चिनी व्यक्ती चौदा वर्षांपासून राजधानी बीजिंग येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर
  • 'चायना डेली'चे वृत्त

Chinese Man Has Been Living At The Airport For 14 Years : बीजिंग : चिनी वस्तू आणि चिनी माणसं यांचा काही भरवसा नाही असं म्हणतात. पण जगजाहीर झालेल्या एका घटनेमुळे चीनमध्ये काहीही होऊ शकते अशीच चर्चा नव्याने सुरू झाली आहे. 

एरवी बस थांबा, रेल्वे स्थानक आणि विमानतळ या ठिकाणांचा सामान्यांशी संबंध येतो तो प्रवासाच्या निमित्ताने. जो-तो नियोजनानुसार प्रवास सुरू करतो. दीर्घ काळ कोणीही बस थांबा, रेल्वे स्थानक, विमानतळ अशा ठिकाणी थांबत नाही. पण एक चिनी व्यक्ती याला अपवाद आहे. ही चिनी व्यक्ती चौदा वर्षांपासून राजधानी बीजिंग येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम करत आहे. बीजिंगच्या टी टू (टर्मिनस दोन किंवा टर्मिनल टू) विमानतळावर या व्यक्तीचा मुक्काम आहे. कोणत्याही विमानात बसायचे नाही की विमानातून उतरायचे नाही पण ही चिनी व्यक्ती बीजिंगच्या टी टू वरून मुक्काम हलवू इच्छित नाही. 

'चायना डेली'च्या प्रतिनिधीशी बोलताना वेई जिआंगुओ (Wei Jianguo) नावाच्या चिनी व्यक्तीने त्याच्या विमानतळावरील मुक्कामाचे कारण सांगितले. धुम्रपान आणि मद्यपान यांचे व्यसन जडलेल्या वेई जिआंगुओ याची नोकरी गेली. नंतर त्याचे पत्नीशी भांडण झाले. अखेर त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही दिवस जवळच्या रेल्वे स्थानकावर मुक्काम केल्यानंतर तो कायमचा बीजिंगच्या टी टू विमानतळावर आला आणि तिथेच स्थिरावला. 

घरातून निघताना वेई जिआंगुओने स्वतःसोबत एक इलेक्ट्रिक कुकर घेतला होता. हा कुकर आजही त्याच्याकडे आहे. विमानतळाच्या परिसरात अनेक दुकानं आहेत. या दुकानांमधून आवडीचे जिन्नस खरेदी करून त्यावर वेई जिआंगुओ दिवस काढत आहे. 

नोकरी गेली असल्यामुळे चीन सरकारकडून वेई जिआंगुओ याला दरमहा एक हजार युआन (सुमारे बारा हजार रुपये) एवढा बेकार भत्ता मिळतो. हा भत्ता जपून वापरत वेई जिआंगुओ विमानतळ परिसरात मुक्काम करत आहे. विमानतळापासून घर १९ किमी अंतरावर आहे. पण पुन्हा घरी गेलो तर भत्त्याचे पैसे पत्नीला द्यावे लागतील आणि तशी इच्छा नाही, असे सांगत वेई जिआंगुओ विमानतळावरच मुक्काम करण्याबाबत ठाम आहे.

याआधी इराणच्या मेहरान करिमी नासीरी नावाच्या निर्वासिताने फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे चार्ल्स द गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका टर्मिनलवर अठरा वर्षे मुक्काम केला. पण वेई जिआंगुओ विक्रमासाठी नाही तर पत्नीला भत्त्याचे पैसे द्यावे लागू नये आणि निवांतपणे जगता यावे यासाठी विमानतळावरील मुक्काम हलवू इच्छित नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी