चीनच्या अध्यक्षांना झाला मेंदूचा आजार

Chinese President Xi Jinping Is Suffering From Cerebral Aneurysm : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना सेरेब्रेल अॅन्युरिसम नावाचा मेंदूचा आजार झाला आहे. मागच्या वर्षी या आजाराच्या उपचारासाठी जिनपिंग काही काळ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.

Chinese President Xi Jinping Is Suffering From Cerebral Aneurysm
चीनच्या अध्यक्षांना झाला मेंदूचा आजार 
थोडं पण कामाचं
  • चीनच्या अध्यक्षांना झाला मेंदूचा आजार
  • मागच्या वर्षी उपचारासाठी जिनपिंग काही काळ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते
  • जिनपिंग यांची तब्येत ढासळत असल्याचे वृत्त

Chinese President Xi Jinping Is Suffering From Cerebral Aneurysm : बीजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना सेरेब्रेल अॅन्युरिसम नावाचा मेंदूचा आजार झाला आहे. मागच्या वर्षी या आजाराच्या उपचारासाठी जिनपिंग काही काळ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. जिनपिंग यांच्यावर चिनी औषधांद्वारे उपचार सुरू आहे. औषधांमुळे मेंदूतील रक्तांच्या पेशींची जाडी कमी होते त्या आणखी पातळ होतात. झटपट उपचारासाठी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया हा उपाय आहे. पण या उपायात धोका आहे. यामुळेच जिनपिंग शस्त्रक्रिया टाळून औषधोपचारांवर भर देत आहेत. पण दीर्घ काळ घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम जाणवण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

जिनपिंग मागील काही महिन्यांपासून विदेशातून येणाऱ्या नेत्यांसोबतच्या वैयक्तिक भेटीगाठी टाळत आहेत. विदेशातून येणारे नेते जिनपिंग यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना भेटून चर्चा करून तसेच काही वेळा महत्त्वाचे करार करून मायदेशी परतत आहेत. यामुळे जिनपिंग यांच्या तब्येतीविषयी चर्चेला उधाण आले आहे. याआधी मार्च २०१९ मध्ये इटली दौऱ्यावेळी एकदा व्यवस्थित चालताना अचानक जिनपिंग धडपडले होते. तसेच ऑक्टोबर २०२० मध्ये शेनझेन येथे भाषण करताना त्यांचा आवाज नेहमीपेक्षा खूप कमी तीव्रतेने ऐकू येत होता. जिनपिंग वारंवार खोकत होते. या घटनांमुळे जिनपिंग आजारी असल्याची चर्चा सुरू झाली. 

काय आहे सेरेब्रेल अॅन्युरिसम

सेरेब्रेल अॅन्युरिसम हा मेंदूचा आजार आहे. हा आजार ५० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना होण्याचा धोका आहे. ज्यांना उच्च रक्तदाब, अनुवंशिक आजार, संसर्ग यापैकी काही झाले आहे अशा ५० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सेरेब्रेल अॅन्युरिसम होण्याचा धोका जास्त आहे. हा आजार मेंदूच्या कोणत्याही भागाला होऊ शकतो. आजारामुळे मेंदूच्या एखाद्या भागातील स्नायू कमकुवत होण्याचा अथवा ते स्नायू फाटण्याचा आणि त्यामुळे मेंदूवर परिणाम होण्याचा धोका आहे.

सेरेब्रेल अॅन्युरिसम झालेल्यांना वारंवार डोकेदुखी, शरीराच्या एका भागाला वा पूर्ण शरीराला पक्षाघाताचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशक्तपणा वाढणे, सतत चक्कर येणे अशा स्वरुपाचे त्रास पण जाणवू लागतात. 

झिरो कोविड पॉलिसी म्हणजे एक रुग्ण आढळला तरी पूर्ण शहरात लॉकडाऊन करायचे या पद्धतीने कठोर धोरण राबविल्यामुळे चीनमध्ये अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. युक्रेन युद्धाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या दोन मोठ्या घटनांचा ताण आल्यामुळे जिनपिंग यांची तब्येत ढासळत असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी