ICSE बोर्डाच्या दहावी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 

CISCE Board Exams 2020: काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन्स म्हणजेच आयसीएसई बोर्डाने आपल्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

cisce board exams remaining subjects class 10 and 12 will be held from 1 july to 14 july 2020 check full details
(प्रातिनिधीक फोटो) 

थोडं पण कामाचं

  • आयसीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर 
  • उर्वरित विषयांच्याच होणार परीक्षा 
  • १ जुलै ते १४ जुलै दरम्यान होणार परीक्षा 

CISCE Board Exams 2020 dates: कोरोना व्हायरसमुळे काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन्स म्हणजेच आयसीएसई बोर्डाने आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. मात्र आता सीआयएससीई बोर्डाने आयसीएसई म्हणजेच १०वी आणि आयएससीई म्हणजेच १२वीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केले आहे.  १०वी आणि १२वी बोर्डाच्या एकूण १४ विषयांच्या परीक्षा अद्याप शिल्लक आहेत. यामध्ये १०वीच्या ६ विषयांचा समावेश आहे तर १२वीच्या ८ विषयांचा समावेश आहे. 

आयसीएसई बोर्डाच्या १०वी आणि १२वी बोर्डाच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचं वेळापत्राक बोर्डाने जाहीर केलं आहे. त्यानुसार १०वीच्या परीक्षा २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत घेण्यात येतील. या काळात केवळ उर्वरित सहा विषयांच्याच परीक्षा होणार आहेत. तर १२वीच्या परीक्षा १ जुलै ते १४ जुलै या कालावधीत होणार असून केवळ उर्वरित आठ विषयांच्याच परीक्षा होणार आहेत.

ICSE १०वीच्या या सहा विषयांची होणार परीक्षा

१०वीच्या भूगोल, हिंदी, बायोलॉजी, एकोनॉमिक्स, ग्रुप ३ इलेक्टिव्ह, आर्ट या सहा विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

ISC १२वीच्या या आठ विषयांची होणार परीक्षा 

बायोलॉजी, बिझनेस स्टडी, जॉग्रॉफी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, होम सायन्स, इलेक्टिव्ह इंग्लिश आणि आर्ट या आठ विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

परीक्षेचा निकाल कधी?

सीआयएससीई बोर्डाच्या दहावी आणि १२वीच्या परीक्षा झाल्यानंतर जवळपास सहा ते आठ आढवड्यांनंतर बोर्ड विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करेल.

कोरोना व्हारयसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या. परीक्षा कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात भेडसावत होता तसेच लॉकडाऊनचा कालावधी सुद्धा वाढथ होता त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. पण आता बोर्डाने उर्वरीत विषय़ांच्या परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी