CISCE ISC 12th Result 2022 announced: काऊंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने इंडियन स्कूल सर्टिफिकेट (ISC) १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती, अखेर आज हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी एकूण १८ विद्यार्थ्यांनी परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यामध्ये ठाण्यातील उपासना नंदी हिचाही समावेश आहे. (CISCE board ISC class 12 result 2022 announced thane girl upasana nandi top in examination check result on cisce org)
आईएससी रिझल्ट २०२२ ची मेरिट लिस्ट सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकूण ९९ टक्क्यांहून अधिक मार्क्स मिळवणाऱ्या देशभरातील १५४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेत ९९.७५ टक्के मार्क्स मिळवत एकूण १८ विद्यार्थ्यांनी पहिली क्रमांक मिळवला आहे. ज्यामध्ये नंदिता मिश्रा, उपासना नंदी (ठाणे), हरिणी राममोहन, नम्या अशोक निचानी, कार्तिक प्रकाश, अनन्या अग्रवाल आणि आकाश श्रीवास्तव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थी आपला निकाल तपासू शकतात. एसएमएसद्वारे निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम मेसेजमध्ये ISC टाईप करुन तुमचा यूनिक आयडी टाईप करा. मग हा मेसेज ०९२४८०८२८८३ वर पाठवा.
अधिक वाचा : FYJC Admissions : आनंदाची बातमी, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा
CISCE ने ISC १२वीची परीक्षा दोन सेमिस्टरमध्ये घेतली होती. पहिल्या सत्रातील परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षा एप्रिल-मे २०२२ या कालावधीत घेतली होती.
यापूर्वी CISCE ने ICSE इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल १७ जुलै रोजी जाहीर केला होता. हा निकाल ९९.९७ टक्के इतका लागला होता. ज्यामध्ये मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९८ टक्के इतके होते तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९७ टक्के इतके होते. यंदाच्या वर्षी चार विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक मिळवला होता. ज्यात पुण्यातील हरगुण कौर मथारू हिचाही समावेश होता.