Booster Dose Free: मोदी सरकारची मोठी घोषणा, 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलैपासून बुस्टर डोस मोफत मिळणार

Coronavirus Booster Dose: कोरोना प्रतिबंधक लसीसोबतच बुस्टर डोसही तितकाच महत्त्वाचा आहे. बुस्टर डोस संदर्भात मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

citizens above 18 years of age will be given booster doses free of cost from july 15 On the occasion of Azadi ka Amrit Kaal
Booster Dose Free: मोदी सरकारची मोठी घोषणा, 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलैपासून बुस्टर डोस मोफत मिळणार (प्रातिनिधिक फोटो) 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • 15 जुलैपासून 18 वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना मिळणार मोफत बुस्टर डोस

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचावासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोफत केलं. त्यानंतर आता आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरुवार म्हणजेच 15 जुलैपासून देशभरातील 18 वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Central Government announced Free Booster Dose from 15th July 2022 to citizens above 18 years) 

देशभरातील 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना ही सुविधा सरकारी लसीकरण केंद्रावर मिळणार आहे. 15 जुलैपासून विशेष मोहिमेअंतर्गत बुस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. ही मोहीम 75 दिवस चालणार आहे. या अंतर्गत ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस देण्यात येणार आहे. 

भारत 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव म्हणून केंद्र सरकारने पुढील 75 दिवस बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांपर्यंत देशभरातील 18 वर्षांहून अधिकच्या वयोगटातील नागरिकांना मोफत बुस्टर डोस मिळणार आहे.

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं होतं. त्यानंतर लस उपलब्ध झाली आणि केंद्र सरकारने मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर देशभरातील विविध सार्वजनिक आरोग्य केंद्रांवर ही लसीकरण मोहिम सुरू झाली. त्यानंतर कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी बुस्टर डोस घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, आधीच्या दोन डोसप्रमाणे बुस्टर डोसही मोफत द्यावा अशी मागणी अनेकांकडून होत होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने पुढील 75 दिवस बुस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली आहे.

हे पण वाचा : पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आतापर्यंत 18 ते 59 वयोगटातील 77 कोटी लोकांपैकी केवळ एक टक्का लोकांनीच बुस्टर डोस घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत मोफत लसीकरणाच्या निर्णयाने या आकडेवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधक लस आणि बुस्टर डोस घेण्याच्या संदर्भातील अंतर 6 महिन्यांपर्यंत कमी केला. जो आधी 9 महिन्यांचा होता. आकडेवारीनुसार, देशात लसीकरणासाठी पात्र असलेल्यांपैकी 96 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 87 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी