गृहमंत्र्यांना नागरीक थेट करू शकणार संपर्क, सीमेवरील स्थानिकांना अमित शाहांनी दिला आपला Mobile Number

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) स्थानिक नागरिकांमध्ये मिसळताना दिसून आले.

Amit Shah gave his Mobile Number to the locals at the border
सीमेवरील स्थानिकांना अमित शाहांनी दिला आपला Mobile Number  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • रविवारी संध्याकाळी ते आरएसपुरा सेक्टरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अमित शाहांनी भेट दिली.
  • मकवालमध्ये शाह यांनी बीएसएफ चौकीवर जाऊन सैनिकांशी आणि स्थानिक लोकांसोबत संवाद साधला.
  • स्थानिक लोकांशी संवाद साधून लोकांच्या मनातील भीती काढून टाकण्याचा शहा यांचा प्रयत्न आहे.

जम्मू: जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) स्थानिक नागरिकांमध्ये मिसळताना दिसून आले. आपल्या तीन दिवसाच्या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी शाह केंद्रशासित प्रदेशाच्या (Union Territory) शीतकालीन राजधानीत दाखल झाले. रविवारी संध्याकाळी ते आरएसपुरा सेक्टरमधील (RSpura Sector) भारत-पाकिस्तान सीमेवरही गेले होते.

जम्मूला लागून असलेल्या मकवालमध्ये त्यांनी बीएसएफ चौकीवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला आणि येथील स्थानिक लोकांसोबत वेळ घालवला. 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्याचा विशेष दर्जा संपुष्टात आणून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर शाह प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. स्थानिक लोकांशी संवाद साधून लोकांच्या मनातील भीती काढून टाकण्याचा शहा यांचा प्रयत्न आहे.

खाटेवर बसून शाहांनी केली स्थानिकांशी चर्चा 

अमित शहा यांनी मकवाल येथील लोकांसोबत चहा घेतला आणि बराच वेळ खाटेवर बसून लोकांशी अतिशय आरामदायक पद्धतीने गप्पा केल्या. गृहमंत्री अमित शहा यांनी येथील एका स्थानिक नागरिकाचा फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. एवढेच नाही तर गृहमंत्र्यांनी त्यांना त्यांचा नंबरही दिला आणि सांगितले की, जेव्हा गरज वाटेल तेव्हा त्यांना ते कॉल करू शकतात.  

'दहशतवादाचा नायनाट करण्याचा उद्देश

तत्पूर्वी, जम्मूच्या भगवती नगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करणे आणि नागरिकांच्या हत्या थांबवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.  ते म्हणाले की, या केंद्रशासित प्रदेशात कोणालाही शांतता आणि विकासात बाधा आणू दिली जाणार नाही. ते म्हणाले की जम्मू आणि काश्मीरमध्ये 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच आली आहे आणि 2022 च्या अखेरीस एकूण गुंतवणूक 51,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. गृहमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे स्थानिक तरुणांना पाच लाख नोकऱ्या मिळतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी