Citzenship Bill in Lok Sabha: नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 10, 2019 | 00:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Citizenship bill in Lok Sabha: नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक सादर केले. त्यानंतर या मतदानावर मतदान घेण्यात आलं आणि हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

citizenship amendment bill lok sabha amit shah india parliament marathi news
नागरिकत्व सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा  

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसबेत मांडले. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मांडले. नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, एमआयएम सारख्या पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध करत गदारोळ घातला. विधेयक मांडण्यासाठी मतदान घेण्यात आले आणि त्यावेळी लोसभेत २९३ विरुद्ध ८२ मतांनी विधेयक सादर करण्यास परवानगी मिळाली. भारतीय नागरिकत्व बहाल करणारं हे विधेयक लोकसभेत सादर केल्यावर त्यावरुन विरोधी पक्षांनी जोरदार गदारोळ घातला आणि काही प्रश्न उपस्थित केले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अमित शहा यांनी उत्तरे दिली. अमित शहा यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर या विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं आणि हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. लोकसभेत घेण्यात आलेल्या मतदाना दरम्यान ३११ विरुद्ध ८० मतांनी हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. लोकसभेत नागरिकत्व सुधारणा मंजूर झाल्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे आता राज्यसभेत मोदी सरकारची या विधेयकावरुन अग्निपरीक्षा असणार आहे.

Lok Sabha UPDATES:

 1. राज्यसभेत मोदी सरकारची अग्निपरीक्षा असणार
 2. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं आता हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार
 3. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने ३११ मतं तर ८० खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं
 4. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर 
 5. शशी थरुर आणि असदुद्दीन ओवैसी यांचा संशोधन प्रस्ताव फेटाळला
 6. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील आक्षेपांवर मतदान प्रक्रिया सुरु 
 7. विरोधी पक्षांच्या प्रश्नांना अमित शहांनी दिली उत्तरे
 8. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत विरोधकांचा गदारोळ 
 9. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर काँग्रेस, एमआयएम पक्षांचा आक्षेप 
 10. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं

काय म्हणाले अमित शहा

 1. भारतात एनआरसी लागू होणार 
 2. ईशान्य भारतातील राज्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची काळजी करु नये 
 3. भारतात रोहिंग्यांना स्थान मिळणार नाही 
 4. पाकव्याप्त काश्मीर भारताचे असून तेथील नागरिकही आपलेच आहेत 
 5. कलम ३७० आणि ३७१ मध्ये फरक आहे, कलम ३७१ ला धक्का लावणार नाही 
 6. जो अवैधरित्या भारतात आहे तो घुसखोर आहे 
 7. आता देशात धर्माच्या आधारावर भेदभाव होणार नाही 
 8. काँग्रेसने कायमच धर्माच्या आधारावर नागरिकत्व दिलं 
 9. हे विधेयक घटनेच्याविरोधी नाहीये
 10. या विधेयकाचा आणि देशातील मुस्लिम नागरिकांचा संबंध नाहीये 
 11. भारतीय संविधान हाच सरकारचा खरा धर्म आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी