'मटण पार्टी' दरम्यान भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, अनेकजण जखमी

Clash during mutton party: एका मटण पार्टी दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्याकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

clash among bjp activist during mutton party jharkhand politics news marathi
'मटण पार्टी' भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, अनेकजण जखमी 

थोडं पण कामाचं

  • पार्टी दरम्यान भाजप कार्यकर्ते एकमेकांत भिडले
  • हाणामारीत अनेक भाजप कार्यकर्ते जखमी
  • जखमी कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल

राजकीय पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्यांना पार्टी देण्यात येत असते. अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एका मटण पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र, या मटण पार्टी दरम्यान भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं समोर आलं आहे. झारखंडमधील जमशेदपूर येथे माजी मुख्यमंत्री रघुबार दास यांनी एका मटण पार्टीचं आयोजन केलं होतं. या मटण पार्टीतच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

जमशेदपूर येथील डिमना लेक येते भाजप कार्यकर्त्यांसाठी मटण पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या पार्टी दरम्यान पक्षातील दोन गटांत वाद झाला. त्यानंतर हा वाद शांतही करण्यात आला. मात्र, त्यानंतर शितला मंदिराजवळ हे कार्यकर्ते आपापसात भिडले. 

भर रस्त्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर लाठी-काठीने हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवला. मात्र, या हाणामारीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या दोन्ही गटातील पाच-पाच कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हा वाद नेमका कोणत्या कारणावरुन सुरु झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.

या हाणामारीच्या घटनेनंतर सोमवारी प्रदेश कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीतही या वादाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. या घटनेनंतर भाजप नेते दिनेश कुमार यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल आणि त्यानंतर दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी