पंजाबच्या पटियालात खलिस्तानवादी आणि शिवसैनिकांमध्ये राडा

clash broke out between khalistani supporters and shiv sena workers in Patiala Punjab : पंजाबमधील पटियाला येथे रस्त्यांवर खलिस्तान समर्थक आणि विरोधक यांच्यात रस्त्यांवर राडा झाला. या हिंसक संघर्षात खलिस्तानला विरोध करणारा गट हा शिवसेनेचा गट होता.

clash broke out between khalistani supporters and shiv sena workers in Patiala Punjab
पंजाबच्या पटियालात खलिस्तानवादी आणि शिवसैनिकांमध्ये राडा 
थोडं पण कामाचं
  • पंजाबच्या पटियालात खलिस्तानवादी आणि शिवसैनिकांमध्ये राडा
  • खलिस्तानला विरोध करणारा गट हा शिवसेनेचा गट
  • पोलीस परवानगी न घेता शिवसेनेचा मोर्चा

clash broke out between khalistani supporters and shiv sena workers in Patiala Punjab : पटियाला : पंजाबमधील पटियाला येथे रस्त्यांवर खलिस्तान समर्थक आणि विरोधक यांच्यात रस्त्यांवर राडा झाला. या हिंसक संघर्षात खलिस्तानला विरोध करणारा गट हा शिवसेनेचा गट होता. पंजाबच्या विधानसभेत शिवसेना नाही. पण तिथे रस्त्यावर खलिस्तान विरोधी आंदोलन करणाऱ्या गटाने स्वतःची ओळख शिवसेना बाळ ठाकरे गट अशी जाहीर केली आहे. कार्यकारी प्रधान हरीश सिंगला यांच्या नेतृत्वात हा गट पटियालातील आर्य समाज चौक येथून खलिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पुढे जात होता. या गटाने मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती.

खलिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पुढे जात असलेल्या मोर्चावर खलिस्तान समर्थकांनी दगडफेक केली. यानंतर पटियालाच्या रस्त्यांवर खलिस्तान समर्थक आणि विरोधक यांच्यात हिंसक संघर्ष झाला. पोलिसांनी बळाचा वापर करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

सध्या सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवून पोलिसांनी हिंसा थांबविली आहे. एसएसपीच्या आदेशावरून हवेत गोळीबार करण्यात आला. यानंतर खलिस्तान समर्थक आणि विरोधक यांची पळापळ झाली. परिस्थिती नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर दगडफेक करत होते. तसेच दोन्ही गटांतील काही व्यक्तींच्या हातांमध्ये तलवारी होत्या. पोलीस आल्यावर दोन्ही गटांची पळापळ झाली.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी घटनेचा निषेध केला तसेच सर्वांना शांतता राखण्याचे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. पंजाबमध्ये कोणालाही हिंसा करू देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसची 'आप'वर टीका

पंजाबमध्ये हिंसा झाल्यानंतर काँग्रेसने आम आदमी पार्टीवर टीका करायला सुरुवात केली आहे. केजरीवाल व्यस्त आहेत आणि मान यांनी अद्याप निर्देश मागितलेले नाही. पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाबमधील परिस्थिती वाईट आहे. प्रशासन कशा प्रकारचे असू नये याचे हे आदर्श उदाहरण म्हणता येईल; अशी टीका काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी केली. 

आम आदमी पार्टी आता पटियालाच्या रस्त्यांवरून शांती मोर्चा काढणार काढणार का, अशा स्वरुपाचा प्रश्न काँग्रेसच्या अलका लांबा यांनी उपस्थित केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी