अनंतनाग : जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, अजूनही सर्च ऑपरेशन चालू आहे. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, बांदीपुरा येथे मारल्या गेलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हा शाहगुंड येथे सुमो वाहन चालकाच्या हत्येत सामील होता. काश्मीर झोनचे पोलिसांनी आयजीपी यांचा हवाला देत ट्विट केलं की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव अहमद डार आहे. तो लष्कर-ए-तोयबा या बंदी करण्यात घातलेल्या संघटनेशी संबंधित होता.
रविवारी बांदीपोरा येथून पकडलेल्या चार दहशतवाद्यांचे कनेक्शन शाहगुंडमधील नागरिकांच्या हत्येशीही संबंधित आहे. पाचवा दहशतवादी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यापूर्वी अनंतनागमध्येही एक दहशतवादी ठार झाला आहे. ही चकमक खगुंड वेरीनाग परिसरात झाली. दरम्यान ऑपरेशन असून चालू आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एक पिस्तूल आणि एक ग्रेनेड जप्त केला आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई पोलीस आणि सुरक्षा दल संयुक्तपणे करत आहे. येथे दोन दहशतवादी असल्याचं सांगितल्या जात आहे.
दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी जम्मू -काश्मीरमध्ये छापेमारी दरम्यान द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) च्या दोन सदस्यांना अटक केली. त्यांची नावे तौसिफ अहमद वानी रहिवासी बारामुल्ला आणि फैज अहमद खान निवासी अनंतनाग अशी सांगण्यात आली आहेत. आतापर्यंतच्या चौकशी दरम्यान, लष्कर-ए-तैयबा आणि टीआरएफच्या नवीन षड्यंत्राचा भंडाफोड करण्यात आला आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या सांगण्यावरून हे लोक लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसोबत मोठ्या घटनेची योजना आखत होते. त्यांचा उद्देश स्थानिक लोकांमध्ये भीती पसरवणे होता. रविवारच्या छाप्यात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पेन ड्राईव्ह इत्यादी जप्त करण्यात आल्या.
विशेष म्हणजे, रविवारी एनआयएने जम्मू -काश्मीरच्या श्रीनगर, सोपोर आणि अनंतनागमधील 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. दहशतवादी कारवायांच्या संदर्भात छापे टाकण्यात आले आणि त्यात 'व्हॉईस ऑफ हिंद' या दहशतवादी नियतकालिकातील प्रकरणाचा समावेश होता. यापूर्वी एनआयएने जम्मू -काश्मीरमध्ये केलेल्या छाप्यांदरम्यान या मासिकाशी संबंधित अनेक लोक उघडकीस आले होते. आणि हे देखील कळले की मासिकाचे महत्त्वाचे काम देखील जम्मू -काश्मीरमधून इसिसच्या बॉसच्या सांगण्यावरून केले जात होते. एनआयएने या प्रकरणात अटक केलेल्यांकडून एक आयईडी देखील जप्त केला होता.