Climate Change | जगातील वायु प्रदूषण धोक्याच्या पातळीवर, भारताची धोक्याची घंटा

Air Pollution | जाणकारांच्या मते मागील काही वर्षात झालेले शहरीकरण, औद्योगिकरण आणि वाढलेली लोकसंख्या यासारख्या कारणांमुळे भारतातील हवेची गुणवत्ता वेगाने ढासळते आहे. २०२० मध्ये जगातील हवेची सर्वात खराब गुणवत्ता असणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावर होता.

Air pollution
वायू प्रदूषण 
थोडं पण कामाचं
  • हवेची सर्वात खराब गुणवत्ता असणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावर
  • देशातील वायु प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम
  • जगभरातील वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर

Air Pollution | नवी दिल्ली: सध्या सर्व जग पर्यावरण आणि हवामान बदलाच्या (Climate Change) गंभीर प्रश्नावर चिंतन करते आहे. अशा परिस्थितीत भारतातील पर्यावरण आणि हवामान बदलाच्या विविध घटकाकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशात सातत्याने वायु प्रदूषण (Air pollution) वाढते आहे. प्रदूषित हवा फक्त आरोग्यासाठीच नव्हेत तर पर्यावरणासाठीदेखील (Enviroment) धोकादायक आहे. वाढते वायू प्रदूषण ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्युटनुसार २०१५ मध्ये भारतात १० लाखांपेक्षा जास्त अकाली मृत्यूचे कारण वायू प्रदूषण होते. तर २०१९मध्ये वायूप्रदूषणामुले १८ टक्के मृत्यू झाले आहेत. याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवरदेखील (Economy) होतो आहे. (Climate Change : Global Air pollution at deadly level, Pollution level in India alarms the bell) 

वायू प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम

वायू प्रदूषणाचा सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यावर तर विपरित परिणाम होतोच आहे. त्याशिवाय विविध क्षेत्रांवरदेखील याचे गंभीर परिणाम होत आहेत. यात माणसांची कार्यक्षमता, कृषी क्षेत्र यासारख्या घटकांचा समावेश आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार २०१९ मध्ये भारतातील १६.७ लाख लोकांच्या मृत्यूमागे वायू प्रदूषण हे गंभीर कारण होते. वायू प्रदूषणामुळे लोकांच्या फुत्फुसावर विपरित परिणाम होत आहेत. त्याच्याशी निगडीत आजार वाढत आहेत. अकाली मृत्यू पावणाऱ्या नवजात अर्भकांच्या मृत्यूलादेखील ६० टक्क्यांपर्यत वायू प्रदूषण कारणीभूत आहे. जर आपण वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर मृत्यू, आजार आणि आर्थिक नुकसान यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील विपरित परिणाम होऊ शकतो.

वायू प्रदूषणात भारत तिसऱ्या क्रमांकावर

जाणकारांच्या मते मागील काही वर्षात झालेले शहरीकरण, औद्योगिकरण आणि वाढलेली लोकसंख्या यासारख्या कारणांमुळे भारतातील हवेची गुणवत्ता वेगाने ढासळते आहे. २०२० मध्ये जगातील हवेची सर्वात खराब गुणवत्ता असणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. भारतातील अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता फारच खराब झालेली आहे. विशेषत: उत्तर भारतातील राज्ये आणि शहरे यामधील वायू प्रदूषणाची स्थिती फारच गंभीर आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तर भारतातील मोठा भूभाग बऱ्याच काळापासून वायू प्रदूषणाच्या विळख्यात आहे. पावसाळा सोडल्यास उर्वरित काळात उत्तर भारतातील लोक वर्षभर वायू प्रदूषणाला सामोरे जातात. यामुळे नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढू शकते. अलीकडेच दिल्लीतील प्रदूषण सूचनांक,पीएम २.५चा स्तर ४६२ होता. प्रत्यक्षात हा आकडा ५० पेक्षाही कमी हवा. लंडनमध्ये पीएम २.५चा स्तर १७ आहे तर न्यूयॉर्कमध्ये ३८ आणि बर्लिनमध्ये २० आहे.

औद्योगिकीकरणाचा परिणाम

औद्योगिकीकरणामुळे झालेल्या प्रदूषणाचा अंदाज कोरोना महामारीच्या काळात लागलेल्या लॉकडाउनच्या काळात आला होता. या काळात कारखाने बंद असल्याने वायू प्रदूषण कमी झाले होते. उत्तर भारतातील अनेक शहरांमधून हिमालयाची शिखरे दिसत होती. कारण हवा स्वच्छ झाली होती. अर्थव्यवस्थेला चालना देताना पर्यावरणाशीदेखील समतोल साधण्याची आवश्यकता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आगामी काळात हा प्रश्न आणखी गंभीर होत जाण्याची चिन्हे आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी